*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौध्द धम्म दिला आहे तो महान आहे -केद्रीय शिक्षक सा.ना. भालेराव गुरुजी*
+++++++++++++++++++
लोहा/ तालुका प्रतिनिधी :- चंद्रकांत वाघमारे
लोहा येथे बी.बी.गायसमुद्रे यांच्या निवासस्थानी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बौद्ध धम्म दिला आहे तो महान आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक सा.ना. भालेराव गुरुजी यांनी लोहा येथे बी.बी.गायसमुद्रे यांच्या निवासस्थानी धम्मदशना कार्यक्रमांत केले.
लोहा येथील क्रांतिसूर्य बुद्ध विहारात दि. ७ जानेवारी २०२६ पासुन १० दिवशीय श्रामणेर व बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबीर सुरु झाले असून दि. १० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता या श्रामणेर संघास वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी.बी. गायसमुद्रे यांच्या निवासस्थानी का.सरिता बन्सी गायसमुद्रे यांच्या पित्यार्थ रेखा बन्सी गायसमुद्रे यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले.
यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संघाचे जोरदार स्वागत करुन त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई विक्रम कांबळे, माजी तालुकाध्यक्ष व्हि.के. कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय बी महाबळे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,प्रा. राजेश ढवळे, बहुभाषिक पत्रकार संघाचे मराठवाडा प्रमुख चंद्रकांत वाघमारे, बाळासाहेब बुद्धे, हणमंत कंधारे व त्याचे सहकारी जोंधळे साहेब, नगगरपालीका लोहा ढवळे मॅडम मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे,प्रेस फोटोग्राफर विनोद महाबळे,भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक सा.ना. भालेराव गुरुजी, केंद्रीय शिक्षक डी.आय. खेडेकर गुरुजी, कार्यक्रमांचे आयोजक महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी.बी. गायसमूद्रे , भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार जिल्हा उपाध्यक्ष पी.एम. वाघमारे गुरुजी,केंद्रीय शिक्षक धोंडीबा यानभुरे, भारतीय बौद्ध महासभेचे लोहा तालुकाध्यक्ष बापुसाहेब कापूरे, लेफ्टनंट कर्नल संतोष दुंडे,केद्रीय शिक्षक तथा सरचिटणीस गिरीश भालेराव,लोहा शहर कोषाध्यक्ष सिध्दार्थ महाबळे, संस्कार सचिव शरद कापुरे, विशाल गायसमूद्रे, सौ.संगिता विशाल गायसमुद्रे,विस्डम कंपनी पुणे चे कार्यकारी संचालक कुणाल बन्सी गायसमूद्रे आदी उपस्थित होते.
यानंतर धम्मदेशना देताना पुढे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक सा.ना. भालेराव गुरुजी म्हणाले की राजगृह प्रति श्रध्दा बाळगुन पुज्य भदंत व श्रामनेर संघास वंदन करतो. या १० दिवसात तुम्हाला या शिबिरात धम्मदेशना ऐकायला जायला पाहिजे. कुशल कर्म करायला पाहिजे. तुम्ही जेवढे दान द्याल तेवढे तुम्हाला फळ मिळेल असे सा.ना. भालेराव गुरुजी म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना केंद्रीय शिक्षक डी.आय . खेडेकर गुरुजी म्हणाले की, म्हणाले की, धम्माचे दान हे सर्व दाना पेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा रस हा सगळ्या रसा पेक्षा चांगला आहे. ज्या माणसाने जीवनात तृष्णा त्यागलि त्या माणसाचे जीवन सुखी होते असे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले. भगवान गौतम बुध्दाचा धम्म हा मंत्रात नाही तर सूत्रात आहे विज्ञानावर आधारित आहे.संघ हा दानशूर व्यक्तीमुळे पुढे आला आहे. आपल्याला त्रीशरण,पंचशील व २३ प्रतिज्ञा कळाल्यावर भरपूर कळाले. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले माणसाच्या कल्याणासाठी धम्म आहे. धम्मासाठी माणुस नाही. प्रत्येक समाजातील व्यक्तींनी जर त्रीशरण, पंचशीलाचे पालन केल्यास कोणतेही तंटे होणार नाहीत पोलिस स्टेशनला जायाचि गरज लागणार नाही.परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २१ वर्ष अभ्यास करून आपल्याला हा धम्म दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे आपल्यात क्रांति झाली आहे.धम्मामुळे आपल्याला वैभव मिळाले आहे असे डी.आय. खेडेकर म्हणाले.


stay connected