यूपीतील गाजियाबादमध्ये घराघरांत तलवारी वाटप; हिंदू रक्षा दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक
गाजियाबाद | वृत्त
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यात घराघरांत जाऊन तलवारी वाटप केल्याप्रकरणी हिंदू रक्षा दल (HRD) संघटनेच्या १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ८ तलवारी जप्त केल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) कपिल कुमार
२) श्याम प्रसाद
३) अरुण जैन
४) रामपाल
५) अमित सिंह
६) अमित कुमार
७) अमित अरोरा
८) मोहित सिंह
९) देवेंद्र बघेल
१०) उजाला सिंह
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या तलवारींचा पुरवठा हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी केल्याचा आरोप आहे. समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे वितरित केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी शस्त्र कायद्यासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि भडकावू कृत्यांवर कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


stay connected