*बाळासाहेब देशमुख यांच्या कथाकथनाने बांधखडकचे ग्रामस्थ मंत्रमुग्ध*
जामखेड- ७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक येथे अहिल्यानगरचे प्रसिद्ध कथाकार बाळासाहेब देशमुख यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या अक्षरा अमोल वारे या विद्यार्थीनीच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर सामूहिक कवायत, विद्यार्थी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देत भरघोस रोख बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी कथाकार बाळासाहेब देशमुख यांनी 'अबोली' व 'शेतकरी राजा' या कथांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बांधखडकसह वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक , पालक आणि ग्रामस्थ यांची् यांची लक्षणीय उपस्थिती होती.गावचे सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी फुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी तर आभार प्रदर्शन उपक्रमशील शिक्षक नितीन घालमे यांनी केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयकुमार वारे तसेच अंकुश वारे,बाबा वारे, मंगेश वारे व आविष्कार वारे या दानशूर शिक्षणप्रेमींकडून कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.


stay connected