जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लोह्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन;लोहा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

 *जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लोह्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन;लोहा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन*

*जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अॕट्रासिटीनुसार गुन्हा दाखल करून मंत्री पदावरून हटविण्याची केली मागणी*





+++++++++++++++++++

लोहा /प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे 


राज्याचे जलसंपदामंत्री  तथा नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दि.२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख कुठेच न केल्याबद्दल  तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेत निषेध नोंदविला या घटनेचचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले असुन  आज दि. २७ जानेवारी २०२६ रोजी लोहा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंदोलन करुन त्यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोहा तहसीलदारामार्फत  निवेदन देण्यात आले.

 पुढे निवेदनात असे नमूद केले की, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी  प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांच्या वेळी  नाशिक चे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा भाषणात उल्लेख केला नसल्याचा पुरावा सोशल मिडियाच्या माध्यमातून वन कर्मचारी माधवी जाधव यांनी जगासमोर आणला म्हणून  माधवी जाधव व दर्शना सौपुरे  यांना स्थानिक पोलीसांनी अटक केल्यामुळे तमाम  आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

तेव्हा महामानव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नावाचा व भारतीय संविधानाचा  आपल्या भाषणात उल्लेख न करणाऱ्या  नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोहा तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.

 सदरील निवेदनावर  वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी.बी. गायसमुद्रे, माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई विक्रम कांबळे,ई.जी. बनसोडे,प्रा. राजेश ढवळे, व्हि.के.कांबळे,वाय. बी. महाबळे,  सुरेश जोंधळे,  विनोद महाबळे,अनिल गायकवाड,  धोंडीबा यानभूरे,नवनाथ आढाव, पांडुरंग कांबळे, सिध्दार्थ ससाणे, किशन हानवते,की.जी.कलंबरकर, कपिल रायबोले, विठ्ठल गोडबोले, गौतम वाघमारे, अनिल ढवळे, भीमराज हंकारे, शेषराव हंकारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.