*स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण, पर्यावरणपुरक सोनखेड येथील जि.प . केंद्रीय.प्रा.व कन्या शाळा*
+++++++++++++++++++
लोहा / चंद्रकांत वाघमारे
लोहा -नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर असलेली लोहा तालुक्यातील सोनखेड ची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व कन्या शाळा ही स्वच्छ, सुंदर व गुणवत्तापूर्ण , पर्यावरणपुरक असलेली शाळा असुन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योग्य तपासणी करून शिक्षण विभागाने गुणदान जर व्यवस्थित दिले तर नांदेड जिल्ह्यात सोनखेड ची जिल्हा परिषद प्राथमिक व कन्या शाळा ही प्रथम क्रमांक पटकावेल यात तीळमात्र शंका नाही.
लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोनखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व कन्या शाळेची पाहणी केली. यावेळी सोनखेड चे उपसरपंच सुनील मोरे,सोनखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कविता मुदखेडे मॅडम, सहशिक्षक अनिल चिद्रावर सर, आर.बी. किडे सर, सौ. विद्या मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी पाहणी केली असता शाळेत एकदम चांगली स्वच्छता दिसून आली . शाळेच्या व्हरांड्यात सुंदर पेव्हर ब्लॉक करण्यात आले आहे. शाळेच्या गेटसमोर सुंदर हिरवागार बगीचा करण्यात आला आहे त्यात हराळी वाढली आहे सुंदर फुलाचे झाडे आहेत.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ फिल्टरच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह ( शौचालय) बांधकाम करण्यात आले आहे.
तसेच झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संतुलन राखा हा संदेश देत शाळेत शुद्ध आॅक्सिजन मिळण्यासाठी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी यासाठी उत्कृष्ट ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच रिकाम्या जागेत परसबाग करण्यात आली आहे.
शाळा व शाळेचा परिसर पॅलास्टिक मुक्त करण्यात आला आहे. सुका कचरा ओला कचरा अलग जमा करण्यासाठी कचरा कुंड्या ठेवल्या आहेत.
शाळेची इमारत अगदी स्वच्छ सुंदर रंग लावलेली . सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी भव्य स्टेज ही उभारण्यात आले आहे.
तसेच शाळेच्या बाहेरील बाजुस सुका व ओला कचऱ्यापासून कंपोस्ट गांडूळ खतासाठी दोन छोटे हौद बांधण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर त्यांची शारिरीक तंदुरुस्त उत्तम राहावी यासाठी खेळाचे मैदान करण्यात आले आहे.
शाळेत विद्यार्थी आल्यावर त्यांना आनंदमय वातावरण निर्माण करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थी व पालक मेळावे ही घेण्यात येतात.
सदरील शाळेला सोनखेड चे उपसरपंच सुनील मोरे नियमित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात.
शाळेतील विद्यार्थी हे अतिशय हुशार शांत , शिस्तीचे आहेत. त्यांच्यावर शिक्षकांनी चांगले संस्कार केलेत. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कविता मुदखेडे मॅडम या सुट्टीच्या दिवशी रविवारी सुद्धा शाळेवर येतात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर शाळेतील साफसफाई स्वच्छतेसह आदी उपक्रम राबवितात. त्यांना पालक, गावकरी नेहमी मदत करतात सर्वांना आपली शाळा आहे वाटते.
सोनखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व कन्या शाळा ही स्वच्छ सुंदर व गुणवत्तापूर्ण पर्यावरणपुरक नांदेड जिल्ह्यात दिसुन येत आहे.



stay connected