टाकळशिंग येथे आ. सुरेश धस यांची प्रगतशील शेतकरी सभापती बद्रीनाथ जगताप शेतीची सखोल पाहणी; दूध उत्पादकांना दिले मोलाचे मार्गदर्शन
***************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश धस यांनी टाकळशिंग येथे भेट देत गावातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व दूध उत्पादकांची सविस्तर बैठक घेऊन आधुनिक शेती, दुग्धव्यवसाय आणि पूरक उद्योगांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप यांच्या २० एकर क्षेत्रावरील मक्याच्या पिकासह द्राक्षे,डाळींब,आंबा या फळबागे सोबत टाकळशिंग गावातील इतर शेतकऱ्यांच्या मक्याच्या पिकांची पाहणी करण्यात आली.पिकांची वाढ, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन व उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यावर आमदार धस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
दूध उत्पादकांसाठी आयोजित बैठकीत गाईला ओला व वाळा चारा किती प्रमाणात द्यावा, चाऱ्याचे संतुलन कसे ठेवावे, तसेच मुरगास तयार करण्यासाठी बेलिंग मशीन,हार्वेस्टर मशीन आपल्या भागासाठी उपलब्ध करणार आहेत.शास्त्रीय पद्धत, साठवण व वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. योग्य आहारामुळे दूध उत्पादनात कशी वाढ होते, याचे प्रत्यक्ष उदाहरण देत आमदार धस यांनी मार्गदर्शन केले.
तसेच दूध व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत कसा करता येईल, गाईंची योग्य निवड, गाई लागवड (ब्रिडिंग), आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण व स्वच्छतेचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला. मुक्त संचार गोठ्यांचे फायदे सांगत अशा पद्धतीने गोठे उभारल्यास गाईंचे आरोग्य सुधारते व उत्पादन वाढते, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच शेततळे, जलव्यवस्थापन, तसेच शेतीला पूरक उत्पन्न देणाऱ्या द्राक्षे, डाळिंब व आंबा फळबाग या फळ बागेचे आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर शेती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना निश्चितच समृद्धी साधता येईल असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.
या पाहणी दरम्यान शेतकरी, दूध उत्पादक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected