वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न









   कडा (प्रतिनिधी) वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर इंग्लिश स्कूल कडा या सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त शाळेचा उडाण -२०२५ हा १४ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला 

प्रमुख पाहुणे म्हणून सीबीएसई बोर्ड सीओई पुणे येथील सेक्शन ऑफीसर श्रीमती पल्लवी माळी मॅडम आणि आष्टी येथे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार श्री भागीरथ धारक साहेब तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन एसबीआय बँकेचे मॅनेजर श्री प्रशांत झाडे साहेब उपस्थित होते.त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष- श्री अमित राठोड उपाध्यक्ष- श्री संदिप चांनोदिया, सचिव -हेमंत मेहेर, कोषाध्यक्ष - डॉ. प्रमोद भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी श्री मनीष गांधी, श्री प्रकाश श्रीश्रीमाळ, श्री अमोल पटवा ,श्री संजय पितळे श्री संतोष गांधी, सल्लागार पी. जी.मेहेर मुख्याध्यापक - अभिलाष के. के., उपमुख्याध्यापिका- श्रीमती.अफशान शेख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. महिला सशक्तीकरण या संकल्पनेवर आधारित महिलांना रूढीवादी विचार आणि भेदभावापासून मुक्त करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक निर्णयप्रक्रियेत समान हक्क आणि संधी देऊन त्यांना सक्षम बनवणे यावर आधारित नाटिका आणि अप्रतिम असे नृत्याविष्कार चिमुकल्यांनी  सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला कडा आणि कडा परिसरातील पालकवर्ग आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.