आष्टी न्यायालयाला सिनियर डीवीजन मंजूर करुन दील्याबद्दल आमदार सुरेश आण्णा धस यांचे वकील संघाकडून आभार
आष्टी तालुक्याच्या न्याय व्यवस्थेला मोठे बळ देणाऱ्या उपजिल्हा न्यायालय मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आष्टी वकील संघाच्या वतीने लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
या उपजिल्हा न्यायालयामुळे आष्टी तालुक्यासह परिसरातील नागरिकांना न्यायप्रक्रियेसाठी जिल्हा ठिकाणी जाण्याची गरज राहणार नसून, न्याय मिळवणे अधिक सुलभ व वेगवान होणार आहे. हा निर्णय सामान्य नागरिक, वकील न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. ताहेर साहेब, सचिव अॅड उद्धव धुमाळ, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ बाबूराव अनारसे, रावसाहेब जगताप आबा, श्रीकृष्ण देशपांडे, बाळासाहेब शेकडे, अविराज निंबाळकर, रियाज सय्यद, अॅड. खिल्लारे, ससाणे, पोकळे, भोकरे यांच्यासह आष्टी वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वकिलांनी सांगितले की, आमदार सुरेश आण्णा धस यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून आष्टीसाठी उपजिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आष्टी तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी वकील संघाच्या वतीने आमदार धस यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
्


stay connected