अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 




नांदेड प्रतिनिधी, चंद्रकांत वाघमारे 

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. नांदेड जिल्ह्यातील या योजनेसाठी तालुकानिहाय उदिष्ट देण्यात आहे. 


योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक 8 मार्च 2017 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुक पात्र बचतगटांनी  सन 2025-26 साठी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.