*अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन नाशिक करिता कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना निमंत्रण*
अहिल्यानगर:- 17 आणि 18 जानेवारी रोजी नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानने आयोजित केलेले, अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन, पार पडले. सदर संमेलन करता अहिल्यानगरचे कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना मुख्य संयोजक श्री सुरेश पवार यांनी निमंत्रित केले होते.
सदर संमेलन ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. तर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सुनंदा पाटील ह्या होत्या. सदर संमेलन मध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन संपन्न झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा अलका दराडे , सुनंदा पाटील, नटवर्य फुलचंद नागटिळक हे मान्यवर होते.
या संमेलनात बाळासाहेब देशमुख यांनी कुटुंबांमध्ये ,समाजामध्ये, हरवत चाललेल्या संवादाची.. कथा सादर केली. आज कुटुंबांमध्ये आपलेपणाने संवाद होत नाही. प्रत्येकाच्या मनात काहीतरी अढी लपून राहते. समाजामध्ये हरवत चाललेल्या नात्यांमध्ये ,आता फक्त एकच संवाद आल्या अर्थाने होताना दिसतो ,तो म्हणजे आजीआजोबा आणि नातवंडामध्ये होणारा परिपूर्ण संवाद. ज्या ज्या घरात वृद्ध आजी-आजोबा असतात, त्याच घरातील नातवंडांवरती संस्काराचा , आचार विचाराचा ,चांगला पगडा दिसून येतो. त्याचं नातवंडांमध्ये हुशारी , जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याचे कौशल्य दिसून येते. आजी आजोबांच्या निखळ वागण्याने, बोलण्याने , नातवंडांची पिढी चांगल्या विचाराने घडलेली दिसून येते. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ,अफलातून नैपुण्य मिळवण्याची चूणूक या नातवंडांमध्ये पहावयास मिळते..
या कथेतून अबोली नातीचा , आपल्या आजोबांबरोबर विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा उलगडा प्रेक्षकांना मनमुराद भावला.. कथेतील भाव भावनांचे कंगोरे ,प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले.
याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मान्यवर साहित्यिकांसह, गझलकार रज्जाक शेख ,ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, प्रा. बाळासाहेब मुतोंडे हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी राजेंद्र मालुंजकर यांनी केले .


stay connected