नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंमलबजावणी मध्ये आष्टी मतदार संघ महाराष्ट्र राज्यात अग्रेसर राहावा..i
प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या गावांना स्थानिक विकास योजनेतून निधी देणार..
आ.सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी) भारतरत्न नानाजी देशमुख यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील डोंगरी येथे गुरुकुलाची स्थापना केलेली असून गोंडा ते बीड या त्यांच्या कार्याशी मी पूर्वीपासून निगडित असून नानाजी देशमुख यांचे समवेत बैठकीच्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी या योजनेचे समन्वयक ग्राम समिती यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुका हा अंमलबजावणी मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक वर अग्रेसर राहावा अशी आपली अपेक्षा आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले
आष्टी येथे आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सरपंच ग्राम समिती यांच्या कार्यशाळेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी श्री गरजे आष्टी तालुका कृषी अधिकारी श्री गोरक्ष तरटे पाटोदा आणि शिरूर तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की
"नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) हा केवळ सरकारी उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील या योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून, आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील निवड झालेल्या गावांचा याद्वारे कायापालट होणार आहे. या योजनेत आपला मतदारसंघ राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे," असे आवाहन करताना ते म्हणाले की आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकावरील ग्रामपंचायत च्या सरपंचांना प्रोत्साहन पर स्थानिक विकास निधीतून विकास कामांना निधी देण्यात येईल असेही त्यांनी शेवटी सांगितले
आष्टी येथील लक्ष्मी लॉन्स येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आष्टी, पाटोदा व शिरूर (का.) तालुक्यातील समाविष्ट गावांच्या ग्रामस्तरीय समिती
पारदर्शकता आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
आमदार धस पुढे म्हणाले की, "या योजनेतील लाभासाठी कृषी सेवकांनी गावात जाणे अनिवार्य आहे. कृषी सेवक गावात जातात की नाही याची खात्री करण्यासाठी त्यांना जीपीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेडनेट, फुलशेती आणि शेळीपालनासारख्या जोडधंद्यांतून गरीब कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, हा मुख्य उद्देश आहे. मी स्वतः प्रत्येक गावात जाऊन योजनेच्या कामाची पाहणी करणार आहे."
अधिकारी आणि मान्यवरांचे मनोगत
• उपविभागीय कृषी अधिकारी गर्जे (बीड): "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला टप्पा यशस्वी झाला. आता दुसऱ्या टप्प्यात समितीतील राजकारण बाजूला ठेवून जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर भर द्यावा."
• आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे: "दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झालेल्या गावांचे भाग्य उजळणार असून, शेतीपूरक व्यवसायांना यातून मोठी बळकटी मिळेल."
• सरपंच विघा गायकवाड: "वैयक्तिक लाभासोबतच जास्तीत जास्त सार्वजनिक आणि सामाजिक कामांवर या योजनेतून भर द्यावा."
शेतकऱ्यांच्या सूचना आणि चर्चा
या कार्यशाळेत विजय मरकड यांनी योजनेची माहिती लोकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. तसेच बाळासाहेब चौरे, महेश कराळे, दिनकर टेकाळे, मच्छिंद्र शेंडगे आणि युवराज गंडाळ यांनी विविध तांत्रिक विषयांवर आपल्या सूचना मांडल्या. विठ्ठल वारे यांनी ग्रामीण भागातील लसीकरण आणि पशुवैद्यकीय सोयींकडे लक्ष वेधले, तर गोरख झेड चुंबळी यांनी गाव समितीमधील त्रुटींकडे लक्ष वेधले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील, तालुका कृषी अधिकारी शेळके (पाटोदा), गोरख तरटे (आष्टी) व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गणेश शिंदे व माऊली जरांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.





stay connected