*प्रा.जितेंद्र देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी.*
(डॉ. उध्दव घोशीर): भिमथडी शिक्षण संस्थेचे स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय दौंड येथे कार्यरत असलेले"प्रा. जितेंद्र देशमुख यांनी रसायनशास्त्र विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे.
प्रा.देशमुख यांनी "हिरव्या दृष्टिकोनाचा वापर करून नायट्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन असलेल्या हेटेरोसायक्लिक संयुगांचे संश्लेषण वैशिष्ट्यीकरण आणि जैविक मूल्यांकन” या विषयावर संभाजीनगर मधील पैठण च्या प्रतिष्ठान महाविद्यालयात संशोधन पूर्ण करत हे यश मिळवले आहे. त्यांच्या संशोधनातून पर्यावरणपूरक व उपयुक्त संमिश्र पदार्थांच्या निर्मिती व उपयोगावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधन कार्यातून त्यांनी ६ संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत. या संपूर्ण संशोधन प्रक्रियेत त्यांना डॉ. एस.जी. सोनकांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशामागे भीमथडी शिक्षण संस्थेचे
चेअरमन श्री.विक्रमसेठ कटारिया ,
सचिव श्री प्रेमसुखजी कटारिया, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. एस .एम .समुद्र
व डॉ.उध्दव चौधर , डॉ. अजय पाटील डॉ.पंजाबराव पडुळ तसेच कुटुंबातील सदस्य व मित्रपरिवार या सर्वांचे सहकार्य लाभले गेले.
देशमुख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांचे हे यश विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


stay connected