विठ्ठल जाधव यांच्या ‘अटर का पटर’ कवितासंग्रहास सूर्योदय बालसाहित्य राज्यपुरस्कार
शिरूर कासार;
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांच्या वतीने दिला उत्कृष्ट बालसाहित्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार शिरूर कासार येथील साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘अटर का पटर’ या ग्रंथास गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या हस्ते जळगाव येथे साहित्यिक डॉ. म.सु. पगारे, डॉ. सतीश बडवे, ॲड. मोहन शुक्ला, माजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, सतीश जैन, शशिकांत हिंगोणेकर यांचे उपस्थितीत दि.२१ रोजी प्रदान करण्यात आला.
मराठी बालसाहित्यात विपुल लेखन करणारे विठ्ठल जाधव यांचे ‘उंदरीन सुंदरीन’, ‘अटर का पटर’ हे बालकविता संग्रह प्रकाशित असुन त्यांचा ‘आलं आभाळ भरून’ हा कवितासंग्रह शासनाच्या पीएमश्री योजनेतून अकरावी बारावी वर्गासाठी अभ्यासात आहे. ‘पांढरा कावळा’ बालकादंबरी आणि ‘बटाटीची धार’ बाल कथासंग्रह प्रसिद्ध आहे. एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य या संशोधनात्मक समीक्षा ग्रंथाची दखल घेतली. जाधव यांच्या ‘अटर का पटर’ या बाल कवितासंग्रहास जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने अखिल भारतीय सूर्योदय साहित्य संमेलनात दामू वासनकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. सतीश म्हस्के, संजीवनी जाधव यांचेसह राज्यातील साहित्यिक, रसिक उपस्थित होते.


stay connected