धामणगाव उपबाजार पेठ शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहा
******************************
सभापती रमजान तांबोळी यांचे शेतकरी, नागरिकांना आवाहन
*******************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, कडा अंतर्गत धामणगाव येथे उभारण्यात आलेल्या उपबाजार पेठेचा भव्य शुभारंभ सोहळा सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा.लोकनेते आ.सुरेश धस यांच्या शुभ हस्ते धामणगाव येथे उपबाजार पेठ आवारात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास शेतकरी,व्यापारी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कडा कृ.उ.बा.समिती सभापती रमजान नूरमहंमद तांबोळी यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. साहेबरावजी दरेकर, माजी आमदार आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघ राहणार असून उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी बद्रिनाथ जगताप,
संजय गाढवे एन. टी. गर्जे, संजना रावसाहेब गाढवे, अशोक गर्जे, बंडु तळेकर, अॅड.साहेबराव म्हस्के,संजय महाजन,खंडू हाके,दिपक पवळ,दत्ताभाऊ काकडे,विकास पवार, प्रल्हाद मुळीक,संजय चितळे, शांतीलाल भोसले, मोहन आमटे,नंदकिशोर करांडे,शत्रुघ्न मरकड,रमेश तांदळे,भरत भवर, लक्ष्मण नन्नवरे,दत्तात्रय खोटे,ज्योतीबा महाडीक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या उपबाजार पेठेमुळे धामणगाव व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जवळची, सुसज्ज व पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा वेळ व खर्च वाचणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी ही उपबाजार पेठ मैलाचा दगड ठरणार असल्याचे सभापती रमजान तांबोळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सभापती रमजान नूरमहंमद तांबोळी, उपसभापती नामदेव आनंदराव धोंडे व सचिव हनुमंत किसन गळगटे उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
यावेळी संचालक मंडळातील संजय ढोबळे, अशोक पवार, राम मधुरकर,संजय मेहेर, मधुकर सायंबर,अण्णासाहेब लांबडे,राजेंद्र गव्हाणे,मुरलीधर फसले,पंडित पोकळे, रामदास शेंडगे,बाबासाहेब शेकडे,राजू हुलगे,जयश्री तळेकर,छायाबाई अशोक लगड,वंदना गायकवाड,बेबीनंदा नागरगोजे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहे.
उया भव्य शुभारंभ सोहळ्यास शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शेवटी सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.


stay connected