*करवीर कोल्हापूर नगरीत गुंजणार.. कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन आवाज..*
अहिल्यानगर :- कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर आयोजित, 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर मध्ये दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक गोविंद त्रिंबकराव लहाने,सोनपेठ परभणी यांची निवड झाली असून, डॉ.सौ. रोहिणी दीक्षित ज्येष्ठ साहित्यिका, उद्घाटन करणार आहेत. तर जीविका सोनार ,सिने अभिनेत्री, प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनात उपस्थित राहणार आहेत. सदर संमेलन मध्ये ,अहिल्यानगर मधील कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन होणार आहे. कोल्हापूर साहित्य संमेलनात मुलाखत, चर्चासत्र, कथाकथन, कवी संमेलन असा भरीव कार्यक्रम होत आहे.
बाळासाहेब देशमुख यांचे या अगोदर शब्दगंध साहित्यिक परिषद संवाद संमेलन आळंदी, प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था आयोजित तेरावे मराठी साहित्य संमेलन देगलूर, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन निमगाव वाघा , भोंडवे ऑर्किड सोसायटी आयोजित 'दीपावली साहित्यिक फराळ' महोत्सव पुणे,सरस्वती शिक्षण मंडळ रात्र महाविद्यालय पुणे, आकाशवाणी बीड केंद्र इत्यादी राज्यस्तरीय कार्यक्रमात कथाकथन संपन्न झालेले आहे.
बाळासाहेब देशमुख यांच्या या निवडीबद्दल साहित्य वर्तुळातून अभिनंदन वर्षाव होत आहे. सकाळ प्रकाशन पुणे यांनी, त्यांचा 'रंग माझा वेगळा' हा कथासंग्रह काढलेला आहे.


stay connected