धानोरा येथील जनता विद्यालयाच्या १९८८ बॅचचा स्नेहमेळावा : दिवंगत गुरूंना श्रध्दांजली , आठवणींना उजाळा, नात्यांची पुन्हा गुंफण

 धानोरा येथील जनता विद्यालयाच्या १९८८ बॅचचा स्नेहमेळावा : दिवंगत गुरूंना श्रध्दांजली , आठवणींना उजाळा, नात्यांची पुन्हा गुंफण





प्रतिनिधी - सय्यद रिजवान / पुणे -

सालाबादप्रमाणे यावर्षीही आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयाच्या इयत्ता दहावी १९८८ च्या बॅचचा गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, मोराची चिंचोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्याला वर्गमित्र-मैत्रिणींसह त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे यंदा हा गेट-टुगेदर फॅमिली गेट-टुगेदर स्वरूपात साजरा करण्यात आला, ज्यामुळे आनंदाला द्विगुणित स्वरूप प्राप्त झाले.

Vdo पहा👇📽️📺



या कार्यक्रमासाठी जवळपास ४२ वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र जमले होते. शिक्षण पूर्ण करून तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या या मित्रांनी आपापल्या आयुष्यातील अनुभव, यश-अपयश, सुख-दुःख यांची मनमोकळी देवाणघेवाण केली. शालेय जीवनातील खोडकर आठवणी, शिक्षकांच्या आठवणी, वर्गातील गमती-जमती यांना उजाळा देताना अनेक क्षण भावूक करणारे ठरले.

या बॅचचा हा पाचवा गेट-टुगेदर असून, प्रत्येक वर्षी अधिकाधिक उत्साह आणि आपुलकीने हा स्नेहमेळावा साजरा केला जात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुकतेच दिवंगत झालेले माजी प्राचार्य गुलाबराव मार्कंडे सर तसेच कला शिक्षिका कांबळे मॅडम यांना उपस्थित सर्व वर्गमित्रांनी दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही घडू शकलो, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

निसर्गरम्य वातावरण, स्वादिष्ट भोजन, आपुलकीची गप्पा आणि कुटुंबीयांचा सहवास यामुळे दिवसभर आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. दैनंदिन धावपळीत हरवलेली नाती पुन्हा नव्याने जोडण्याचे काम या गेट-टुगेदरने केले. शेवटी पुढील वर्षी पुन्हा अधिक मोठ्या संख्येने भेटण्याचा संकल्प करत हा स्नेहमेळावा उत्साहात आणि समाधानाच्या भावनेत संपन्न झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.