राजे धर्माजी गडाच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी; आ. सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन

 राजे धर्माजी गडाच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी; आ. सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन




आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथील ऐतिहासिक राजे धर्माजी गडावर प्रादेशिक पर्यटन विभागाच्या योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते पार पडले.



या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्ता, भक्तनिवास तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे गडावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांची सोय होऊन स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे परिसरातील आर्थिक विकासासही बळ मिळेल, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी यावेळी केले. राजे धर्माजी गडाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमास रामगड येथील ह. भ. प. आंधळे महाराज लिंबोडीकर, सावर्गाव येथील ह. भ. प. अभिमन्यू खाडे महाराज, गडाचे मठाधिपती ह. भ. प. रोहिदास महाराज शास्त्री, माजी आमदार साहेबराव दरेकर (नाना), ह. भ. प. विष्णू महाराज यांच्यासह आदिनाथ सानप, पोपट गर्जे, विठ्ठल गर्जे, अशोक गर्जे, भाऊसाहेब भवर, माऊली जरांगे, युवराज तरटे, धनंजय तरटे, काकासाहेब गर्जे, बाबू गर्जे, इंद्रजीत गर्जे, गर्जे फौजी, अश्रूबा खलाटे, रमेश खलाटे, सारूक मामा, कारभारी गर्जे, दिलीप भराटे, इंद्रजीत गोल्हार, शिवाजी गर्जे, अजिनाथ गर्जे, लोखंडे, बाळासाहेब सकुंडे, सरपंच महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.