*बीड जिल्हा खादीम-उल-हुज्जाज कमिटी तर्फे मोठा उपक्रम*
*हजयात्रा साठी जाणाऱ्या यात्रीसाठी एक महिन्याची कार्य शाळा, मार्गदर्शन शिबिर*
*हज 2026 साठी जाणाऱ्या बीड शहरांच्या सर्व हाजींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा : हाजी बी. एस मोहसीन*
बीड ( प्रतिनिधी) :
बीड जिल्हा खादीम-उल-हुज्जाज कमिटी तर्फे हज यात्रा 2026 साठी जाणाऱ्या बीड शहरांच्या यात्रियानं साठी एक महिन्याची कार्य शाळा, मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेली आहे. हे कार्ये शाळा 2 जनवरी 2026 रोजी मदीना मस्जिद, मोमिन पुरा, बीड येथील दर रोज रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. मदीना मस्जिद , मोमिन पुरा बीड येथील होणारी कार्येशाळा फक्त पुरुषांसाठी आयोजित केलेली आहे .हज 2026 साठी जाणाऱ्या बीड शहरातील सर्व पुरुषांनी जास्त जास्त लाभ घ्यावा.
महिलांसाठी हे कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिर 10 जनवरी 2026 रोजी मदरसा-तुल-मोमीनात, बलभीम चौक, बीड येथील दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे. हज 2026 साठी जाणाऱ्या बीड शहरातील सर्व महिलांनी जास्त जास्त लाभ घ्यावा.
मुस्लिम धर्मा मध्ये श्रीमंत असलेल्या मुस्लिम बांधव आणि बहिणी वर आयुष्यात एकदा हज फर्ज केलेला आहे. फर्ज हज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवना इंडिया ते सऊदी अरेबिया मक्का मध्ये जावे लागतात . पूर्ण जगातील सर्वात पवित्र जागा मक्का आणि मदीना आहे. हाजी मक्का मध्ये जाऊन आपला फर्ज हज अदा करतात.मार्गदर्शन शिबिर, कार्य शाळा मध्ये हज यात्रा मध्ये उमराह , हज, मक्का मदिना येथील जे जे आमाल, कार्य करावा लागतात ते सर्व आमाल सविस्तर ज्येष्ठ मुस्लिम धर्म गुरू मुफ्ती अब्दुल मुखिम साहेब हाजियाना सविस्तर शिकवतात.
जिल्हाभरातून मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर हजयात्रासाठी जातात. हाजी यांच्या सेवेसाठी, हज जाण्याच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी बीड जिल्हा खादीम-उल-हुज्जाज कमिटी मागील तीन वर्षा पासून मार्गदर्शन शिबिर, कार्ये शाळा आयोजित करत आहेत.
हज 2026 साठी जाणाऱ्या सर्व हाजींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी बीड जिल्हा खादीम उल हुज्जाज कमिटीच्या अध्यक्ष हाजी बी.एस. मोहसीन यांच्याशी संपर्क साधावा. 9272427393 असे आवाहन कामेटीचे अध्यक्ष बी.एस मोहसीन यांनी केले आहे.


stay connected