शुक्रवारी महेश सहकारी साखर कारखान्यावर
शेतकरी मेळाव्याचे आयोजन
---माजी आ.भीमराव धोंडे
-----------------
-----------------
आष्टी (प्रतिनिधी)
तालुक्यातीलमहेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने तालुक्यातील व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य ऊस व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर भव्य मार्गदर्शनपर शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा.महेश साखर कारखान्याच्या कार्यस्थळी करण्यात आले आहे. या मेळाव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.
या मेळाव्यात ऊस उत्पादन वाढ, उत्पादन खर्चात बचत,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन,सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, ACFI चे वरिष्ठ अधिकारी, II Care Foundation चे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे आगमन होणार असून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात येणार आहे.त्यानंतर उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संचालक करणार असून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली जाणार आहे.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमात II Care Foundation व ACFI चे अधिकारी विठ्ठल भापकर हे ऊस लागवड पद्धती, सुधारित बियाणे, योग्य खत व्यवस्थापन,पाणी नियोजन,रोग व किड नियंत्रण, उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. II Care Foundation च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरीपूरक योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
यानंतर नाना ऊस तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ श्री. नवनाथ गायकवाड हे आधुनिक ऊस तंत्रज्ञान,नव्या लागवड पद्धती, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे,ऊसाची गुणवत्ता कशी सुधारावी, शाश्वत ऊस शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन मिळणार असल्याने हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. ACFI च्या मान्यवरांच्या मनोगतातून ACFI चे कार्य, II Care Foundation चा सहभाग,एकत्रित कामाचे धोरण, शेतकरी हितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच शेतकऱ्यांना होणारे आर्थिक व तांत्रिक फायदे याविषयी माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमात स्क्रीनवरून भाग १, भाग २ व भाग ३ असे ऊस व्यवस्थापनावर आधारित व्हिडिओ सादरीकरण होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना ऊस शेतीतील आधुनिक पद्धती, प्रात्यक्षिक उदाहरणे व यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोगी ठरणारी माहिती मिळणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य मार्गदर्शनपर कार्यक्रमास महेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------


stay connected