पाटोदा येथे मोफत नाडी परिक्षण तपासणी शिबीर

पाटोदा येथे मोफत नाडी परिक्षण तपासणी शिबीर



 पाटोदा शहरातील सर्व जनतेसाठी  रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा या उदार प्रेरणेने आयबी न्युज संचलित पाटोदा शहरातील सर्व जनतेसाठी मोफत नाडी परिक्षण तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे तरी सर्व जनतेने या शिबीराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .या शिबीरासाठी प्रसिध्द नाडी तज्ञ डॉ. गोविंद कामटे सर (Auu, Dnys) आयुर्वेदीक विद्या विशारद व नाडी तज्ञ

तसेच डॉ . कृष्णा खरवडे (Auu, Dnys) आयुर्वेदीक तज्ञ उपस्थित राहणार आहेत .

* खालील सर्व आजारांवर नाडी परिक्षण करून उपचार करण्यात येणार आहे .

गुडघेदुखी, कमरेचे आजार, जुनाट सर्दी, ॲसीडीटी, मुळव्याध, मुतखडा, शुगर, कोड (सफेद डाग) हदयरोग, हाता पायाला मुंग्या येणे, वजन कमी करणे व वजन वाढविणे, केस गळणे, थायरॉईड, दमा, किडणी विकार, मायग्रेन, गजकर्ण, खाज, सोरायसीस, व्यसनमुक्ती समस्या तसेच महिलांचे आजार यावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करण्यात येतील .

हे शिबीर काळा हनुमान मंदिर , अरब गल्ली पाटोदा ता. पाटोदा जि.बीड येथे रविवार दिनांक २८/१२/२०२५ रोजी वेळ १० ते २ पर्यत हे शिबीर होणार आहे शिबीरासाठी नाव नोंदणी संपर्क : 9890158686 हा असुन जास्तीत जास्त गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक - संपादक इद्रीस चाऊस / अमोल उमाटे - वेदशक्ती हेल्थ केअर / नवनाथ बनकर संभाजी नगर यांनी केले आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.