डॉ.सय्यद वलीयुद्दीन यांची बंगळुरू येथे एमडी बालरोग साठी निवड

 डॉ.सय्यद वलीयुद्दीन यांची बंगळुरू येथे एमडी बालरोग साठी निवड 




आष्टी प्रतिनिधी- आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद वलीयुद्दीन यांची कर्नाटकातील बंगळूरू येथील प्रतिष्ठित महाविद्यालयात एमडी बालरोग अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. डॉ.सय्यद वलीयुद्दीन यांचे बीएएमएसचे पूर्ण शिक्षण संगमनेर सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात विशेष प्राविण्यासह पूर्ण झाले आहे.प्राथमिक ते एच.एस.सी.पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद नंबर 01,गंगुबाई आनंदराव धोंडे विद्यालय,पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, श्री गणेश विद्यालय, एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. आष्टी येथील दंतचिकित्सक डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांचे ते लहान बंधू आहेत. या यशाबद्दल डॉ.सय्यद वलीयुद्दीन यांचे आ.सुरेश आण्णा धस,माजी आ.भीमराव धोंडे साहेब,माजी आ.साहेबराव दरेकर नाना,माजी आ.बाळासाहेब आजबे काका,संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर, प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,चिंचाळ्याचे सरपंच पंडित पोकळे,जालिंदर पोकळे,दिगंबर पोकळे,गणपत पोकळे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.