निळा ग्रामपंचायत मधे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
लोहा:-२६ नोव्हें तालुक्यातिल निळा येथील ग्रामपंचायत मधे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बालाजी गजले हे होते.यावेळी भारतीय संविधानाचे ८५% बहुजन समाजाला असलेले योगदान,संविधानाची गरज व महत्व,संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना दिलेले मौलिक अधिकार व कर्तव्याची जाणीव आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरपंच बालाजी गजले यांनी सांगितले
तत्पूर्वी सरपंच बालाजी गजले, सोपानराव मोरे पोलिस पाटील निळा, आनंदा शेटेवाड सामाजिक कार्यकर्ते आमोल गजले सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार तथा राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे मराठवाडा प्रमुख चंद्रकांत वाघमारे यांच्या हस्ते संवीधानकार , भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून वंदन करण्यात आले.त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक संविधान प्रस्तावीकेचे वाचन केले.यावेळी प्रामुख्याने पुर्णा तालुक्यातील निळा कानखेड येथिल मा.श्री.हिंगोले साहेब उपस्थित होते.


stay connected