संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिला - पो. नि. भाऊसाहेब गोसावी
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. भारतीय संविधान हे आपल्याला समानतेचा व जगण्याचा हक्क देते. संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा आहे. असे मत वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी वेळापूर मुली शाळेत संविधान दिनानिमित्त बोलताना मत व्यक्त केले*.
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी सदस्य बाळासाहेब धाईजे होते*.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक शा व्य. स. अध्यक्ष रणजित सरवदे यांनी केले*.
*कार्यक्रमासाठी रिपाई चे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, अमृत माने देशमुख, भैय्यासाहेब बाबर दत्ता वाघमारे, अण्णा कुचेकर, वेळापूरचे केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईक नवरे ओंकार खराडे, पिनू एडगे, स्वप्निल सरवदे, शंकराव काळोखे महेश साठे अविराज अवघडे, महादेव नाईक नवरे, राहुल साठे,राहुल गायकवाड,भाऊ थोरात*, *किसन ओवाळ आदी उपस्थित होते*.
*कार्यक्रमासाठी इंग्लिश स्कूल वेळापूर जि प वेळापूर मुले जि प उर्दू शाळा वेळापूर, आदी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती*.
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेळापूर मुले मुख्याध्यापक किरण काळे वेळापूर मुले शाळेचे श्रीम. किरण घाडगे पांडुरंग, कुलकर्णी, प्रविणककुमार पांगे सौ. कविता आवटे आदिनी परिश्रम घेतले*. *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी केले*



stay connected