देवळाली (लोखंडवाडीच्या) शिवनाथ पवारची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 देवळाली (लोखंडवाडीच्या) शिवनाथ पवारची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 




आष्टी (प्रतिनिधी)शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आष्टी संस्थापक अध्यक्ष मा. भिमराव धोंडे साहेब यांच्या संस्थेचे शिक्षक मच्छिंद्र पवार यांचा मुलगा शिवनाथ मच्छिंद्र पवार यानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत

 फलटण येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे

आष्टी तालुक्यातील देवळाली लोखंडवाडी येथील शिवनाथ मच्छिंद्र पवार याची ६१ किलो गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ६ नोव्हें ते ७ नोव्हें रोजी फलटण येथे झालेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ६१ किलो गटातून शिवनाथ मच्छिंद्र पवार यांनी प्रतिस्पर्ध्याचे तगडे आव्हान मोडून काढीत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले आहे शिवनाथची चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच्या या यशाचे देवळाली व परिसरात कौतुक होत आहे.शिवनाथचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा ,लोखंडवाडी येथे झाले त्याचे माध्यमिक शिक्षण रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर येथे झाले आहे .डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर विळद घाट येथे शिवनाथ ने पदवी शिक्षण बीएस्सी ॲग्री साठी प्रवेश घेतलेला आहे. शिवनाथ यास स्पर्धेसाठी मा. प्राचार्य एस. बी .राऊत व क्रीडा शिक्षक आर. बी. सोनवणे सर व प्राध्यापक संभाजी राजे कुस्ती केंद्र, अ.नगर व जय हनुमान तालीम,आष्टी जि. बीड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्याच्या या यशाने देवळाली(लोखंडवाडी)च्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.