अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड सेंटरचा स्तूत्य उपक्रम

 आष्टीतील लिमटाका गणपती मंदिरात ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान


अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड सेंटरचा स्तूत्य उपक्रम 



आष्टी । प्रतिनिधी 

दिवाळीच्या सुट्या आणि अतिवृष्टीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये झालेल्या घटामुळे रक्ततुटवडा निर्माण झाल्याने, अहिल्यानगर येथील लोक राज्य सामाजिक प्रतिष्ठान संचलित साईसेवा ब्लड सेंटरने शनिवार दि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आष्टी येथील प्रसिद्ध लिमटाका गणपती मंदिरात एक रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित या शिबिरात एकूण ४५ युवक रक्तदात्यांनी उदारहृदयाने रक्तदान केले. गेल्या काही महिन्यांपासून आष्टी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यात काही जीवितहानी झाली होती. या आपत्तीमुळे रक्तदान शिबिरे मोडकळीस आल्याने रक्ताचा तुटवडा पडला होता, ज्यामुळे हे शिबिर आयोजित करण्यात आले.या उपक्रमास नगरसेवक सुनील रेडेकर आणि आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी साईसेवा ब्लड सेंटरचे संचालक अजित जगताप, डॉ. बागर, परिचारिका पायल वैद्य, जमुना उगले, प्रतिक्षा मदनकर, पियुष खेबडे, किशन कव्हाळे इत्यादी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.