बिबट्यापासून बचवाचे शोधले उपाय..

 बिबट्यापासून बचवाचे शोधले उपाय..



पुणे :  शिरूर तालुक्यात, बिबट्याच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी आणि ग्रामस्थांनी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालण्यास सुरुवात केली आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो, त्यामुळे या पट्ट्यामुळे बिबट्याचा हल्ला रोखता येईल, अशी यामागील कल्पना आहे. 


बिबट्याचा वाढता धोका आणि त्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज, यामुळे ही अनोखी युक्ती वापरली जात आहे.  बिबट्या हल्ला करताना मानेवर हल्ला करतो. गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा असल्याने, बिबट्या हल्ला करू शकणार नाही, असा अंदाज आहे.


कुत्र्यांसाठी असलेले टोकदार खिळ्यांचे पट्टे पाहून ही कल्पना सुचली, ज्यामुळे शेतातील पाळीव प्राणी सुरक्षित राहत होते, असे काही ठिकाणी म्हटले गेले आहे. हीच युक्ती आता तेथे माणसांनी स्वतःसाठी सुरू केली आहे. सध्या त्या भागात यासंबधी मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना सुरू आहेत. ऊस तोडणी हंगाम सुरू झाला की हा प्रश्न निर्माण होत असतो. ऊस तोडला जाऊन शेते रिकामी होऊपर्यंत ही समस्या गंभीर बनलेली असते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.