शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून आ.सुरेश धस यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत घेतली सविस्तर बैठक
आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना सतत जाणवणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणी तसेच वारंवार खराब होणारे ट्रान्सफॉर्मर या गंभीर प्रश्नांबाबत आ. सुरेश धस यांनी महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा केली.तसेच शेतकऱ्यांना स्थिर आणि दिवसभर वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना शासनाने सुरू केली आहे.मात्र यासाठी होत असलेला विलंब टाळता यावा,यामध्ये खासगी कंपन्यांवर प्रशासकीय नियंत्रण असावे जेणेकरून सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढेल, पिकांना वेळेवर पाणी मिळेल आणि वीजेवरील अवलंबित्व कमी होईल,याबाबत सविस्तर चर्चा केली.
गेल्या काही दिवसांत अनेक गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर बाबत शेतकऱ्यांनी आ.सुरेश धस यांचेकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या.याबाबत महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी आ.धस यांनी महावितरण कार्यालयात जाऊन बैठक घेत सध्याच्या काळात पिकांना आवश्यक पाणीपुरवठा होण्यात मोठा अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी शेतकरी ट्रान्सफॉर्मरची मागणी करत असून याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अधिकचे ट्रान्सफॉर्मर या आठवड्यात उपलब्ध कसे होतील यावर मी लक्ष देऊन असल्याचे सांगत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी
जळालेले किंवा क्षमतेअभावी बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर याची माहिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2 दिवसात मिळवावी आणि त्या ठिकाणी आवश्यक तो पूर्ण क्षमतेने दिवसा वीजपुरवठा देण्यावर भर द्यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच जिथे दुरुस्तीचे काम अनावश्यकपणे दिवसन्दिवस लांबू न देता
शेतकऱ्यांना वेळेवर आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने स्टाफ व साहित्य उपलब्ध करण्यावर भर देण्याचा सूचना देखील केल्या.यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,नगरसेवक शरीफ शेख,भाऊसाहेब निंबाळकर,इम्रान तांबोळी,आदी उपस्थित होते.



stay connected