अजित पवारांना कर्जमाफी करायला जड जातंय? लेकाला महार वतनाच्या च्या जमीनी पुरेनात? -डॉ जितीन वंजारे

 *अजित पवारांना कर्जमाफी करायला जड जातंय? लेकाला महार वतनाच्या च्या जमीनी पुरेनात? -डॉ जितीन वंजारे*



   बीड प्रतिनिधी :- सारखं सारखं कर्जमाफी शेतकऱ्यांनी मागू नये, शेतकऱ्यांनी फुकटची खाण्याची सवय लावू नये असे शेतकऱ्यांना शहाणपणाच्या गोष्टी सांगणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांच्या मुलाने कोरेगाव पार्क येथील 1800 कोटीची जमीन 300 कोटी मध्ये लाटण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे शेतकर्यापोटी आकस भाव मनामध्ये असणारे कर्जमाफी जसे की स्वतःच्या खिशातूनच द्यायचे आहे त्यामुळे मागे मागे हात करणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी चुलत्याचा पक्ष नावावर करून घेणारे आणि महाराष्ट्रामध्ये पहाटे चार वाजता भूतो नं भविष्य शपथ घेऊन उपमुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे स्वार्थी अजित पवार म्हणजेच भ्रष्ट मुलाचा भ्रष्ट बाप असल्याची महाराष्ट्राने पाहिले आहे, अशा भ्रष्टाचारी नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करा असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी मांडले आहे. अजित पवार हा मराठा असून आजकाल मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण पाहिजे आहे,मराठ्यांना महार वतनाच्या जागा पाहिजे आहेत, मराठ्यांना जैन वतनाच्या जागा पाहीहे आहेत म्हणजेच एकीकडे महाराष्ट्रभर दलित नेत्यांना संपवायचं, दलितांच्या महार वतनाच्या जमिनी लुटायच्या, दलितांना निधी द्यायचा नाही, दलितांवर शैक्षणिक बजेट द्यायचं नाही, महाराष्ट्र मधूनच नव्हे तर देशामधून दलित आणि ओबीसी नेते नष्ट करायचे, महाराष्ट्रामध्ये तर काही सुपारीबाज स्वयंघोषित समाजकारन्यानी तर ओबीसी नेत्यांना समूळ नष्ट करण्याचा चंग बांधलेला आहे.स्वतःवरच स्वतःचे मारेकरी पाठवून संबंधित लोकांचे नाव घेऊन त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याचं ठरवलेलं आहे हे महाराष्ट्राला घातक ठरणार आहे,समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजा-समाजामध्ये भांडणे निर्माण करून जातीयवाद अन धर्मवादाच राजकारण जे भाजप प्रणित पक्ष करत आहेत ते महाराष्ट्राला घातक आहे. एकीकडे धर्मवाद जातीयवाद पेटवून तस्तम महार वतनाच्या, जैन वतनाच्या व ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या जमिनीचे भूखंड सर्रासपणे भाजपा नेते राष्ट्रवादी अजित पवार गट नेते व शिंदे गटाचे नेते लुटत आहेत. नुकताच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी खरेदी केलेली 1800 कोटीची जमीन 300 कोटींमध्ये फक्त पाचशे रुपयांच्या बॉण्ड वरती दिली गेली, घेणारा अन देणारा भांग आणि गांजा पिलेला होता की काय? देणारे घेणारे कोण आहेत? त्यांच्यावरती कार्यवाही झालीच पाहिजे परंतु त्याच बरोबर या सर्व घोटाळ्याचा मास्टरमाइंड पार्थ पवार यावरही रीतशीर कार्यवाही केली गेली पाहिजे आणि नैतिकता म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा केव्हा देणार आहात हे ही स्पष्ट करा. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी जसा तुमचा हात आखडत आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाडक्या पुत्राने केलेल्या भ्रष्टाचारासाठी त्याला सजाही मिळालीच पाहिजे. ही सामान्य जनतेच आणि शेतकऱ्याच म्हणणं आहे.

           भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाच सरकार हे संगंमत करून शासकीय भूखंड लुटत आहेत. शिंदे गटाने नवी मुंबई येथील सिडको ची पाच हजार कोटी रुपायची जमीन लुटली, संभाजीनगर मध्ये शिंदे गटाने एम आय डी सी ची शेकडो कोटीची जमीन लाटली, पुण्यामध्ये जैन बोर्डिंग ची अठरा हजार कोटीची जमीन भाजपा ने लुटली, आणि आत्ता पुण्यात कोरेगाव पार्क येथील महार वतनाची अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये फक्त पाचशे रुपायाच्या बोन्ड वर पार्थ पवार ने लुटली अरे चाललंय तरी काय? अजित पवार चा लाडका पुत्र हजारो कोटीची जमीन लाटतो.पुण्यात कृषी विभागाची पंधरा एकर जमीन याच पार्थ पवार च्या आमीडिया कंपनी ने लुबाडली आहे, अठराशे कोटी रुपायची जमीन तीनशे कोटी ला घेतली त्यातही एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरली नाही आणि फक्त पाचशे रुपायात ती जमीन लाटली आणि मुख्यमंत्री फडणवीष आणि सुप्रिया सुळे पार्थ पवार ला क्लीन चिट देतात बावनकुळे म्हणतो त्यात पार्थ ची सही नाही. तो आरोपी नाही,हे असं झालय दगड लागला तर दगडावर कार्यवाही करा मारणारा मोकाट सोडा अरे भावड्यानो तो दगड कोणी मारला ते बघा कुत्र्यासारखं दगडाला धरून उपयोग नाही वाघासारखं मारणारा कोण आहे तो पकडा आणि तो पार्थ आहे त्याला अटक झालीच पाहिजे. आणि अजित पवार बोलतो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही शेतकरी फुकट खायला सोकलेत अरे अजित पवार तुम्ही सगळे भ्रष्टाचारी आहात तुमच्या तोंडून पवित्र शेतकऱ्यांना असं काही बोलू नका. धरणात मुतणारे अजित पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा दाबणारे अजित पवार,सकाळी पहाटे म्हातारा राज्यपाल कोश्यारी ला उठवून महाराष्ट्र झोपेत असताना शपत घेणारे अजित पवार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीत बोलतात अरे थू असल्या राजकारण्यावर. इतके लबाड राजकारणी पाहिले नाहीत. जून पर्यंत कर्जमाफी नाही दिली तर नांगरासकट बैल सरकारच्या डांगीत घालू असं वक्तव्य शेतकरी आणि दलित नेते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.