*राज्यस्तरीय लोकशक्ती साहित्यरत्न पुरस्काराने , साहित्यिक बाळासाहेब देशमुख सन्मानित*

 *राज्यस्तरीय लोकशक्ती साहित्यरत्न पुरस्काराने , साहित्यिक बाळासाहेब देशमुख सन्मानित*



अहिल्यानगर :-'लोकशक्ती न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य' च्या प्रथम वर्धापनदिन निमीत्त , राज्यस्तरीय लोकशक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर पुरस्कार वितरण, यश ग्रँड हॉटेल अहिल्यानगर येथे , उद्या शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर २५ रोजी होत आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर तर कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड हे करणार आहेत. सदर कार्यक्रमात अहिल्यानगर मधील कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना 'लोकशक्ती साहित्य रत्न' हा राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्यिक लेखनाबद्दल , बहाल करण्यात येणार आहे.



बाळासाहेब देशमुख हे साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असून, त्यांचे प्रासंगीका , वात्रटिका ,ललीत लेख ,कथा असे अनेक प्रकारचे साहित्यिक लेखन सातत्याने वृत्तपत्र , दिवाळी अंक मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये नगरी झटका , नगरी फोडणी हे प्रसंगीका सदर ,रंग माझा वेगळा , बदललेला गाव , हरवलेली माणसे ,या कथा लेखमाला ,इत्यादी सदर विशेषता जास्त गाजलेले आहेत. लोकप्रिय झालेले आहेत. सध्या त्यांच्या 'साहित्य कट्टा' या सदर मध्ये कथा प्रसिद्ध होत असतात.

सदर कार्यक्रमांमध्ये गावरान मस्ती फेम श्री वैभव कुर्हाडे व सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित , यांसह  डॉ. दत्ताराम राठोड , संतोष मुटकुळे, प्रल्हाद गीते ,कृष्णा मसुरे ,अन्सार शेख ,किरण बेरड , डॉक्टर आम्रपाली मोहिते , डॉ. भाऊसाहेब देवकाते या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत  हा सोहळा होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.