मैथिली सुरेश धस हिची महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघात निवड

 मैथिली सुरेश धस हिची महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघात निवड 

***************************



*************************

आष्टी (प्रतिनिधी)

कामोठे (पनवेल) येथे दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा व निवड चाचणी या स्पर्धेत आष्टी येथील अनिषा ग्लोबल स्कूल येथील विद्यार्थिनी मैथिली सुरेश धस (वयोगट 17 वर्षांखालील मुली) हिने आपल्या उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघात स्थान पटकावले आहे.

      मैथिली हिच्या या उल्लेखनीय यशामुळे ती आता येत्या शालेय राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्या या कामगिरीने आष्टी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्याचा मान उंचावला आहे.मैथिली हिने स्पर्धेत आपल्या चिकाटी, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी साकारली.तिला या टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक अजिम शेख आणि दिपाली काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल आमदार सुरेश धस, प्राजक्ता धस,देवस्थानचे सर्व ट्रस्टी,अनिषा ग्लोबल स्कूलचे प्राचार्य अविनाश राऊत,तपन गौडा, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मैथिलीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.