कडा व्यापारी संघटना व शिवनेरी पथ संस्था यांच्या वतीने स्मशानभूमीचे दुरूस्ती
कडिनदीच्या महापुरात स्मशानभूमीचे नुकसान झाली होते
कडा (प्रतिनिधी) मागील महिन्यात कडिनदीला आलेल्या महापुरात स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अंत्यसंस्कार करते वेळी खुप अडचणीचा सामना करावा लागत होता. हि अडचण पाहून कडा येथील व्यापारी संघटना व शिवनेरी पथ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या स्मशानभूमीचे दुरूस्ती काम नागेश तात्या कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे अंत्यसंस्कार करतांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही या सामाजिक कार्याचे कडा व परिसरातील जनतेतून कौतुक होत असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



stay connected