१५ दिवसात महेशला लायसन्स मिळाले नाही तर साखर संघाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार - माजी आ.भीमराव धोंडे Bhimrao Dhonde

 आ.धस साहेब अंभोरा साखर कारखाना आणला त्यांचे काय  झाले ? निवडणुकीत हरलो तरी शेतकऱ्यांसाठी काम करतच राहणार ....१५ दिवसात महेशला लायसन्स मिळाले नाही तर साखर संघाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार - माजी आ.भीमराव धोंडे 


------------------------







--------------------------

आष्टी (प्रतिनिधी) 

महेश सहकारी साखर कारखाना विक्रीला निघाला होता.शेतकऱ्यांचा कारखाना होता.म्हणून आपण तो घेतला नाही. जुन्या नेत्यांनी खुप कष्टाने हा सहकारी साखर कारखाना उभा केला होता. ज्यांनी काढला ते आता नाहीत. आपण निवडणुकीत  तो कारखाना जिंकला ऊस क्षेत्र वाढले आहे. इतर पिके परवडत नाही.त्यामुळे ऊस महत्वाची आहे. परवाना काढण्यासाठी खुप प्रयत्न केले मुख्यमंत्री व इतरांना भेटलो आहे. आपण मतदार संघात शैक्षणिक विकास केला.खाजगी कारखान्यासाठी हा बंद पाडू नका. मला बोलावुन घ्या.. आपण दिल्लीला जाऊ,आ. सुरेश धस साहेब आपण अंभोरा येथे साखर कारखाना आणला त्यांचे काय केले? निवडणुकीत हरलो तरी शेतकऱ्यांसाठी काम करातच राहणार आहोत.आ. सुरेशराव धस साहेब अंभोरा साखर कारखाना आणला त्यांचे काय  झाले ? निवडणुकीत हरलो तरी शेतकऱ्यांसाठी काम करतच राहणार ..१५ दिवसात महेशला लायसन्स मिळाले नाही तर  साखर संघाच्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा  इशारा शेतकऱ्यांचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिला.

     बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अयोजीत  धरणे आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. 

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयापासून चालत जात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


 माजी आ.भीमराव  धोंडे यावेळी म्हणाले की,  महेशच्या लायसन्ससाठी १५ दिवसांत तिव्र आंदोलन करु आंदोलना शिवाय सरकार वठणीवर येत नाही.लोकांसाठी जो काम करतो.कारखाना जपण्यासाठी प्रयत्न करा.जेष्ठ लोकांचे मोठे योगदान आहे. आम्ही परवाना मिळवूनच घेऊ.परवाना रद्द करताना आम्हाला नोटीस आली नाही.आ.सुरेश धस आपण मुख्यमंत्री फडणवीसकडे आम्हांला घेऊन चला..हे सार्वजनिक काम आहे. लोकांचा कारखाना आहे.

ऊसतोड कामगार महामंडळ यांनी मजुरांवर होणारा अन्याय दुर करण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आता मिडियाने बीडची बदनामी थांबवावी. राज्यात सर्वत्र घटना घडतात.

 यावेळी सरपंच दादा जगताप, काॕ.महादेव नागरगोजे,ॲड. संभाजी दहातोंडे,शिवाजी नाकाडे,राजपाल शेंडगे,अशोक साळवे,माऊली पानसंबळ, सुरेश राख,दादासाहेब मुंडे, सुदाम झिंजुर्के,राम खाडे, नियामत बेग,डाॕ.अजयदादा धोंडे,ॲड.भाऊसाहेब लटपटे, उपसभापती देविदास शेंडगे,

पांडुरंग नागरगोजे,रामराव खेडकर यांची भाषणे झाली.

    यावेळी ॲड.हनुमंत थोरवे, संतोष जाधव,बाळासाहेब पवार,राम खाडे,भाऊसाहेब लटपटे,अजय  धोंडे,अभय धोंडे,नियामत बेग,राजाबापु नलावडे,रामराव खेडकर, अशोक साळवे,डाॕ.पंढरीनाथ गोरे,बाजीराव हजारे,दादासाहेब मुंडे,राजेंद्र धोंडे,किशोर खोले, दिलीप म्हस्के,विजय कोठारी, अंकुश मुंढे,मधुकर ढाकणे, संतोषभैय्या चव्हाण,सौ.इंदुबाई गोल्हार,सुरेश राख,सतीषमामा झगडे,सरपंच सावता ससाणे, युवराज खटके,आदिनाथ गवळी,छगन तरटे,माऊली पानसंबळ,महारुद्र  खेडकर, हरिभाऊ बेलेकर,पांडुरंग नागरगोजे,संभाजी जगताप, विष्णु खेडकर,बाबासाहेब अंधाळे,गौतम सावंत, बाळासाहेब शिंदे,उत्तम बोडखे,  अभय गर्जे,सदाशिव दिंडे,एन. एम.बडे,बबन औटे,सरपंच भरत जाधव,सुदाम झिंजुर्के, पांडुरंग गावडे,हरिभाऊ जंजीरे,अस्लम बेग,दिलीपराव काळे,महादेव दानवे,शिवाजी वनवे,सुधीर जगताप,जगन्नाथ ढोबळे, बबन नन्नवरे,शेख अन्सारभाई,ॲड.अश्रफ सय्यद, अस्ताकभाई शेख,राजाराम नन्नवरे,बबन आणेराव,रघुनाथ शिंदे,आप्पासाहेब राऊत, मधुकर शिरोळे,राम गाडे, सरपंच सोमनाथ गायकवाड, नंदकुमार फसले,बाबा घुले,सुधीर ढोबळे, दादासाहेब हजारे,सदाशिव तुपे,कुंडलीक आस्वर,दिपक बोराडे, तुकाराम मांडवेकर,माजी सभापती लांबरुड,शहादेव खेडकर, बाळासाहेब वाघुले,नानाभाऊ वाडेकर,आबासाहेब राऊत, बाबा ससाणे,अस्लम बेग, बाजीराव हजारे,बबनराव सांगळे,बजरंग कर्डीले, चेअरमन शाम सांगळे,सरपंच माऊली वाघ, सरपंच संजय विधाते,सुदाम झिंजुर्के, तुकाराम चव्हाण,राधाकिसन सिरसाट आदि मान्यवर उपस्थित होते.  

 अहिल्यानगर  येथील बी.आर. इव्हेंट प्रस्तुत राजा शिवछत्रपती शाहिरी कलावंत शेवगान अक्षय डांगरे आणि सहकारी यांनी शेतकरी गीते सादर केली. 

 यावेळी राम खाडे यांनी सांगितले की,सहकार क्षेत्रातील कारखान्याचा परवाना रद्द करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.ॲड. भाऊसाहेब लटपटे यांनी आ.सुरेश धस यांच्यावर जोरदार टिका केली.डाॕ.अजयदादा धोंडे यांनी सांगितले की,सामान्य लोकांसाठी आम्ही काम करतो, खरी ताकद सामान्य माणसात आहे.आम्ही लोकांच्या कामात आहोत. महेश (कडा) साखर कारखाना तालुक्यातील वैभव आहे. त्यांचे पुनर्वसन करायचे आहे.आता लायसन्स दिले नाही तर पुणे येथे साखर आयुक्तासमोर भव्य आंदोलन करूया.पाटोदा मार्केट कमिटीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी सांगितले की, परवाना रद्द करणे ही खुप मोठी घटना आहे.राजकारणात खुन्नस चांगले नाही.आमदार असताना भीमराव धोंडे यांनी मतदार संघांत डांबरी रस्ते केले. रामराव खेडकर यांनी सांगितले की, मतदार संघात ९ लाख टन ऊस आहे. महेश  साखर कारखाना भीमराव धोंडे यांचा नाही. शेतकऱ्यांचा आहे.यांचे भान शासनाने ठेवावे. 

 यावेळी मिरजगाव,जामखेड, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचल प्राचार्य डाॕ.बाळासाहेब खेमगर तर आभार संतोष लक्ष्मणतात्या जाधव याश यांनी मानले   

---------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.