सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समस्त आष्टीकर आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली धावले
आष्टी (प्रतिनिधी) –
भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी 6 वाजता आष्टी शहरात “एकतादौड”चे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हजारो आष्टीकरांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
सकाळी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून अभिवादन करत या दौडला सुरुवात झाली.त्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या दौडचा समारोप झाला.या वेळी विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि शासकीय कार्यालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.“एक भारत – श्रेष्ठ भारत” या घोषणांनी संपूर्ण आष्टी शहर दुमदुमून गेले.
आ. सुरेश धस यांनी या प्रसंगी बोलताना म्हटले की, “सरदार पटेल यांनी भारताच्या एकतेसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यातून आपण सर्वांनी एकता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घ्यावा.”या कार्यक्रमात स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांचे सहकार्य लाभले.यावेळी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,तालुका कृषि अधिकारी गोरख तरटे,भाजपा तालुकाध्यक्ष अनिल ढोबळे,गणेश शिंदे,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,रंगनाथ धोंडे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,नगरसेवक शरीफ शेख, अँड.बाळासाहेब मोरे,नगरसेवक बाळासाहेब घोडके,नगरसेवक इर्शान शेख,आत्माराम फुंदे, टायगर अकॅडमी, बाबाजी अकॅडमी, पोलीस अधिकारी,कर्मचारी,आदी उपस्थित होते.



stay connected