राजकीय दृष्टी ठेवुन कडा सुरु करण्यासाठी खोडा घालु नका आणखी दोन कारखाने सुरु करा आमचा कसलाही विरोध नाही - माजी आ. भीमराव धोंडे
-----------------
-----------------
आष्टी (प्रतिनिधी)
माजी आ.स्व.श्रीपतराव कदम,
गहिनाथ पाटील,माजी आ. भाऊसाहेब आजबे,माजी आ. निवृत्तीराव उगले,स्वातंत्र्य सैनिक स्व.साहेबराव थोरवे, भाऊसाहेब वाळके हे आणि यांच्यासारखे मान्यवरांनी कडा सह.साखर कारखाना उभारण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत.त्यांच्या या स्वप्नातील वास्तुला वाचविले पाहिजे.कडा सह.साखर कारखान्याचे लायसन्स रद्द झाल्याने ते लायसन्स मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाणार आहे.आजपर्यंत मी कधीच सत्तेत असताना कुणाचेच कामे आडवली नाहीत आणि आता आपण कारखाना सुरू करीत असतांना तालुक्यातील राजकारण्यांनी कुरघोडी व आडवा आडवी न करता मतदार संघाच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. ... आमदारसाहेब राजकीय व्देष न करता आणखी दोन कारखान्याने सुरु करा आमचे दुमत अथवा विरोध नाही. राजकीय दृष्टी ठेवुन कडा सुरु करण्यासाठी खोडा घालु नका. आणखी दोन कारखाने सुरु करा आमचा कसलाही विरोध नाही असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकारांशी पुढे बोलताना सांगितले की,आष्टी तालुक्यातील कडा (महेश) सहकारी साखर कारखान्याचा परवाना साखर आयुक्त यांनी कसलीच पुर्व कल्पना न देता रद्द केला आहे. त्याविरोधात दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.पहिल्या पिढीतील कारभारी मंडळी यांनी हा कारखाना उभारणीत
माजी आ.स्व. श्रीपतराव कदम,
गहिनाथ पाटील,माजी आ. भाऊसाहेब आजबे,माजी आ. निवृत्तीराव उगले,स्वातंत्र्य सैनिक स्व.साहेबराव थोरवे, भाऊसाहेब वाळके यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर आपण आमदार असतांना हा कारखाना निवडणुकीतुन जिंकलो आणि जवळपास २५ वर्ष हा कारखाना आपण चालविला. त्यानंतर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अन आपल्या कारखान्यासह राज्यातील बरेच कारखाने बंद पडले.त्यामुळे हा कारखाना आवसायानात निघाला होता. आता परत आपण ओटीएस मधून रितसर हा कारखाना पैसे भरून संचालक मंडळाने घेतला आहे. यामध्ये राजकारण करत हा कारखाना सुरू न व्हावा म्हणून सत्ताधारी आमदार सुरेश धस हे खोडा घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
----------++
सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्याची देशातील पहिली वेळ
-------------------
खाजगी कारखान्याचा आणि सहकारी कारखान्याचा काहीही संबंध नसतांना या कारखान्याचा परवाना कमी अंतर असल्याचे कारण दाखवून हा परवाना रद्द करण्यात आला आहे.परंतु सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द करण्याची घटना राज्यात नव्हे भारत देशातील पहिली घटना असल्याचेही माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले.
-----------
सुरु असलेले कामे
बंद करायची मला सवय नाही
------------------
आपण वयाच्या २४ व्या. वर्षी मतदार संघाचा आमदार झालो त्यावेळेस पासूनच आपण समाजकारण, राजकारण करतो. मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जवळपास २० वर्ष नेतृत्व केले. पण या सत्तेच्या काळात कुणाचेच काम आडवले नाही आणि सुरु काम तर कधीच बंद पाडले नाही.कारण तशी सवय आपल्याला नाही असा टोला आमदार धस यांचे नाव न घेता माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लगावला आहे.
-------------------



stay connected