चिखली येथील आई लक्ष्मीमाता मंदिर सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
आ.सुरेश धस यांचे ग्रामस्थांकडून आभार
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील धार्मिक पर्यटन स्थळांच्या उभारणीला मोठी चालना मिळाली असून
प्रादेशिक पर्यटन विकास योजना (२०२५–२६) अंतर्गत या योजनेतून आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने चिखली ग्रामस्थांच्या अस्मितेचे व श्रद्धेचे प्रतीक असलेल्या ग्रामदैवत श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले असून चिखली ग्रामस्थ, श्रद्धावंत भाविक आणि मराठवाडा भूषण लोकनेते आ. सुरेश अण्णा धस प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
आष्टी तालुक्यातील चिखलीसह परिसरातील नागरिकांच्या अखंड श्रद्धेचे व आध्यात्मिक बळाचे केंद्र असलेले आईलक्ष्मीमाता मंदिर हे वर्षानुवर्षे भक्तांच्या भावविश्वात नांदत आहे. मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.या पवित्र स्थळाच्या सुशोभीकरणामुळे परिसराला नवचैतन्य लाभणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
ही मंजुरी मिळवून देण्यासाठी मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश धस यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांना आज यश मिळाले असून, राज्य सरकार व आमदार सुरेश धस यांचे चिखली ग्रामस्थ, श्रद्धावंत भाविक आणि मराठवाडा भूषण लोकनेते आ.सुरेश धस प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.



stay connected