वाळूंज येथे श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर विकासासाठी तब्बल ७८ लाखांची मंजुरी
**************************
आ. सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून कृतज्ञतेची भावना
***************************
**************************
आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र वाळूंज येथील भैरवनाथ मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, तर जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून यात्रास्थळ विकासासाठी २८ लाख रुपये असा एकूण ७८ लाख रुपयांचा निधी मराठवाडा भूषण, लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हे यश मिळाले असल्याने ग्रामस्थांच्यावतीने आमदार सुरेश धस यांचे
मा.सरपंच विष्णू खाडे यांनी मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे.
श्री क्षेत्र वाळूंज हे आष्टी तालुक्यातील श्रद्धेचे आणि भाविकांच्या मनातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे. आमदार सुरेश धस यांची देखील या तीर्थक्षेत्रावर मनोभावे श्रद्धा आहे.येथे प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमा होऊन येणाऱ्या पहिल्या रविवारी भव्य यात्रा महोत्सव भरतो.या यात्रेदरम्यान आष्टी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात.यात्रा काळात येणाऱ्या भक्तगणांची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, प्रसाद वितरणाची आणि वाहनतळाच्या सुशोभीकरणाची व यात्रास्थळाच्या सुविधांची गरज जाणवत होती. या गरजेला ओळखून आमदार सुरेश धस यांनी भैरवनाथ महाराजांच्या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगल्या सुविधा मिळाव्यात,यासाठी राज्य सरकार आणि विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या या प्रयत्नांने भैरवनाथ मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.मंदिराच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले गेले असून श्री भैरवनाथावर वाळूंज ग्रामस्थांसह परिसरातील जामगाव, देवीगव्हाण,केळसांगवी,चिखली,टाकळसिंग, हिंगणी पारगाव जो.आणि मंगरूळ या गावच्या श्रद्धास्थान असलेल्या ग्रामस्थांच्यावतीने आमदार सुरेश धस यांचे वाळूंजचे मा.सरपंच विष्णू खाडे यांनी आभार मानले आहेत.



stay connected