सरकारने पूरग्रस्तांना एकरी पन्नास हजार देऊन 'सातबारा कोरा' करावा- माजी मंत्री महादेव जानकर
--------------------
कडा परिसरात जानकर यांची आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना भेट
----------------------
राजेंद्र जैन /कडा
----------------------
राज्य सरकार पूरग्रस्तांना हेक्टरी साडेआठ हजार देतेय, आणि एका एकराला बावीस खर्च हजार येतोय. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं असावा सवाल उपस्थित करून, राज्य व केंद्र सरकारने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा राज्य सरकारने ज्यांची शेती पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. अशा संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना एकरी पन्नास हजार देऊन 'सातबारा कोरा' करावा. अशी जोरदार मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री माजी मंत्री महादेव जानकर यांनी कडा परिसरातील आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांना दिलेल्या भेटीदरम्यान केली आहे.
आष्टी तालुक्यातील मागील पंधरा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, लहान मोठे व्यावसायिक आणि वंचित घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपतिग्रस्तांसह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रासपचे नेते महादेव जानकर गुरुवारी कडा आले होते. परिसरात पूरग्रस्तांची झालेली अवस्था पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांनी यापूर्वी वादा केला होता की, आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, तो वादा तिघांनी पूर्ण करून सर्व वंचित घटकांना मदत करावी. आपत्तीग्रस्तांचे अजूनही काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. रेशन मिळाले नाही, राज्यात व केंद्रात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी एकत्रित बसून पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून प्रत्येक कुटुंबीयाला मोफत वैद्यकीय सेवा पुरवावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करून दिलासा दिलासादायक निर्णय घ्यावा. आम्ही मत मागायला आलो नाही तर पूरग्रस्तांचे अश्रू पुसायला, धीर द्यायला आलो असल्याची जाणकार म्हणाले. आम्हाला समतावादी बनायचे आहे धर्मवादी नाही. असेही जानकर यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजी शेंडगे, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, रिपाईचे नेते अशोक साळवे, बबन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
---------%-----------
stay connected