मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजासाठी वेळ द्यावा - इंजि.तानाजी जंजिरे
आपण ज्या समाजात राहात असतो त्या समाजाने आपल्याला घडवलेले असते. गरीब -श्रीमंत व्यापारी ,नोकरदार, वकील, प्राध्यापक ,कारखानदार, उद्योगपती आधी विशेषने आपल्याला समाजानेच दिलेली असतात. त्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो. म्हणून प्रत्येकाने समाजासाठी वेळ दिला पाहिजे. व आपल्या परीने आपापले योगदान समाजाच्या कल्याणासाठी दिले पाहिजे. असे प्रतिपादन इंजि.तानाजी बापू जंजिरे यांनी आष्टी येथे केले. मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह आष्टी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या अध्यक्षिय भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजामध्ये अनेक शोषित, वंचित व गरीब लोक आहेत.त्यांच्या कल्याणासाठी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाचा शैक्षणिक ,सामाजिक, व सांस्कृतिक विकास विकास होणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झाले पाहिजे आणि इतरांनी या लढ्यासाठी सहिष्णुता दाखवून पाठिंबा दिला पाहिजे.
मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका समाजाला समजावून सांगने जरुरी आहे. आपला मतलब सोडून एकमेकाकडे गेले पाहिजे. एक तरी पाऊल पुढे टाकले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी ॲड. सीताराम पोकळे, ॲड. संभाजी दहातोंडे, लक्ष्मण रेडेकर, सुरेश पवार सर, डॉ.टाळके सर, प्राचार्य शशिकांत कन्हेरे. डॉ. वांढरे सर, शेख रहीम यांनी आपापल्या कक्षाबद्दलची कामाची माहिती दिली . यावेळी छाया कदम, वर्षा शिंदे, दीपक पोकळे, प्रल्हाद तळेकर, शिवाजीराव पाचे, इंजि. तात्यासाहेब पोकळे वगैरे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.बी. एन. मुटकुळे यांनी केले. आभार प्रदर्शन भास्करराव निंबाळकर यांनी केले.
#####################
Advertise
stay connected