अतिवृष्टीमुळे झेंडूची फुले पाण्यात, शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान
-------------------------
महसूल प्रशासन अद्याप शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नाही
----------------------
कडा / वार्ताहर
---------------------
तालुक्यातील वटनवाडी येथील शेतकरी रावसाहेब पोकळे या सर्वसामान्य शेतकऱ्याने दिवाळी, दसऱ्याचा सण डोळ्यासमोर ठेवून पाऊण एकरात झेंडूच्या फुलाची लागवड केली. मात्र अतिवृष्टी झाल्यामुळे पुराच्या पाण्यात त्यांचं भविष्याचा स्वप्न पाण्यात वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले. मात्र पंधरा दिवस लोटले तरी अजूनही महसूल प्रशासन त्यांच्या बांधावर पोहोचलेले दिसत नाही.
आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील अतिशय सामान्य कुटुंबातील शेतकरी रावसाहेब गंगाधर पोकळे यांचे अतिवृष्टी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने दिवाळी, दसऱ्याचा सण डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यात पाऊण एकर शेतामध्ये सहा हजार झेंडूच्या रोपांची फुलाची लागवड केली. त्यासाठी 35 ते 40 हजाराचा खर्च केला. रात्रंदिवस झेंडूच्या फुलाची काळजी घेऊन राखण केली. मात्र नियतीला त्यांच्या कुटुंबाचा सुख पावला नाही. अतिवृष्टीमुळे शेतातील झेंडूचे फुले अक्षरशः पाण्यात बुडून सडल्यामुळे या शेतकऱ्याचं भविष्याचा स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत करावी अशी मागणी रावसाहेब पोकळे करीत आहेत.
-------%%--------
stay connected