पत्रकार अविनाश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने व विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वांच्या सेवेसाठी कायम कार्यरत राहणार - अविनाश कदम
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी शहरांसह तालुक्यात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही समाजसेवा करीत आणि पत्रकार म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास आष्टी युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै लोकमत, मराठवाडा साथीचे आष्टी तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांनी व्यक्त केला. दरम्यान मित्र परिवाराच्या वतीने व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
पत्रकार अविनाश कदम यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी आष्टी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त अविनाश कदम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना पत्रकार अविनाश कदम यांनी सांगितले की, आष्टी शहरांसह तालुक्यातील नागरिकांनी व मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक पत्रकार म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते आपल्या सामाजिक कार्याच्या व लेखनीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास पत्रकार कदम यांनी व्यक्त केला.आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार सुरेश धस,माजी आ भिमराव धोंडे,माजी आ साहेबराव दरेकर, माजी आ बाळासाहेब आजबे,तहसीलदार वैशाली पाटील, शिवसेनेच्या नेत्या रेश्माताई जगताप, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतिश शिंदे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, गटशिक्षणाधिकारी सीमा काळे यांच्यासह राजकीय व अधिकारी, सरपंच, उपसरपंच, शैक्षणिक, सामाजिक, संपादक, धार्मिक, पत्रकार आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी व मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, भ्रमणध्वनी, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


stay connected