संपदा आत्महत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या - आ सुरेश धस

संपदा आत्महत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या - आ सुरेश धस



 संपदाच्या आई वडिलांनी केवळ तीन एकरावरती तिला डॉक्टर केले आणि तिच्या आत्महत्याच्या म्हणजे सुसाईड नोट मध्ये  हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील हे सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे फासा वरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे. फास्टट्रॅक वरती तर हा खटला चाललाच पाहिजे परंतु एसआयटी ही स्थापना यांच्यामध्ये झाली पाहिजे. पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकीबाळीला शिकवतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर त्यांना जरब बसली पाहिजे. इथून पुढे दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत आहे.तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही बीडचे लोक पोटाला चिमटा घेऊन काबाडकष्ट करून,ऊसतोडून लेकरं उच्चशिक्षित करत आहेत.बीडची म्हणून कोणी हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठ दुर्दैव आहे.आमचे बीडचे लोक बुद्धिमान आहेत आणि सर्व क्षेत्रात पुढे आहेत.या घटनेत जे कोणी खासदार त्यांचे पी ए असतील ते सुद्धा यात आरोपी झाले पाहिजेत.त्या लेकरावरती अत्याचार होत असताना तिने तक्रार दिली होती तिची दखल न घेणारे जे जे कोणी असतील ते या प्रकरणी दोषी आहेत.मी संपदा च्या बाजूने ठामपणे उभा आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.