आदरणीय *जे .आर .पवार* साहेब यांच्या जीवनावर आधारित..... *जीवन गौरव ग्रंथ* प्रकाशित करणार ..... इंजि. तानाजी जंजिरे

 आदरणीय  जे .आर .पवार साहेब यांच्या जीवनावर आधारित...जीवन गौरव ग्रंथ प्रकाशित करणार .. इंजि. तानाजी जंजिरे




          बीड (प्रतिनिधी)

          बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपळा हे जन्मगाव असलेले व पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व कार्यकारी सल्लागार  आदरणीय जे. आर .पवार साहेब वयाच्या 71 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. तब्बल 48 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना निवृत्ती मिळाली! नोकरी करीत असताना समाजासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. म्हणून त्यांच्या जीवनावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन करणार असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी (बापू) जंजिरे यांनी जाहीर केले.

         शिवश्री पवार साहेब हे मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे वतीने हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. शिवश्री जे.आर .पवार साहेब यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयाशी  संपर्क आलेल्या व्यक्तीकडून पवार साहेबाच्या 

कार्यावर आधारित लेख मागवण्यात येत आहेत. 

        पवार साहेबांचे जन्मगाव पिंपळा येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याच्या वेळी वरील निर्णय इंजि. जंजिरे बापू यांनी बोलून दाखवला. त्यावेळी त्यांच्याबरोबर तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे अध्यक्ष ॲड. सीताराम पोकळे , वधुवर कक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव पाचे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी सर्व शिवश्री भास्करराव निंबाळकर, लक्ष्मण रेडेकर , शिवकृपा पतसंस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे सर, शिरीष (भाऊ )थोरवे, बाजीराव वाळके, सुहास चौधरी, रमेश आबदार सर आदी मान्यवर उपस्थित होते. 

       तरी आदरणीय जे.आर. पवार साहेब यांचे शाळा- महाविद्यालयातील मित्र, नोकरीतील मित्र, नातेवाईक, त्यांचे गुरुजन वर्ग व आप्तस्वकीय यांनी आपापले लेख ॲड. सीताराम त्रिंबकराव पोकळे, पत्रकार मुक्काम पोस्ट बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड पिन 41 42 08 

मो. 94 21 63 80 55 या पत्त्यावर पोस्टाने, कुरियरने किंवा समक्ष पाठवावेत असे आवाहन प्रा. डॉ. दत्तात्रय नरसाळे सर यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.