विलास गभाले यांना महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाचे उपशिक्षक विलास गभाले यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था(पु) महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव आयकॉन अवॉर्ड २०२५ यांना प्रदान करण्यात आला.
गभाले यांना शैक्षणिक कार्याबद्दल हा विशेष पुरस्कार झी टॉकीज फेम ह.भ.प. शिवशाहीर कल्याण महाराज काळे आणि राजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील तथा अण्णा, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हस्के तथा भाऊ,संकुलाचे मा.प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव,उपप्राचार्या अलका आहेर उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे पर्यवेक्षिका संगीता सांगळे, प्रा.डॉ. शरद दुधाट, प्रा. संजय डुबे,जेष्ठशिक्षक संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे, सर्व स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच शिक्षणप्रेमी, सर्व सेवकवृंद आणि विद्यार्थी आदिनी कौतुक केले


stay connected