डॉ संपदा मुंडे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही का? तिच्या व्यवस्थेतील मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या-डॉ.जितीन वंजारे*

 *डॉ संपदा मुंडे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही का? तिच्या व्यवस्थेतील मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या-डॉ.जितीन वंजारे*




बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणच्या मूळ रहिवासी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी तळहातावर आत्महतेचे कारण लिहिले होते, आत्महत्यापूर्वी माझ्या कुटुंबियांवर पोस्ट मोर्टम रिपोर्ट बदलवण्यासाठी दबाव आणला जातोय मला मानसिक अन शारीरिक त्रास दिला जातोय अशी तक्रार ही त्यांनी उप विभागीय कार्यालयात दिली होती. परंतु त्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही न केल्यामुळे डॉ संपदा मुंडे यांचा त्रास वाढला असावा आणि त्यामुळे त्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे. हा सपशेल शासकीय व्यवस्थेचा बळी असून संबंधित अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि त्यांना त्रास देणारे सर्वच राजकीय लोकांवर कठोर शासन करा.डॉ संपदा मुंडे ह्या गरीबी परिस्थितीतून एमबीबीएस सारखे उच्च शिक्षण पूर्ण करून फलटण या ठिकाणी शासकीय सेवेत रुजू होत्या परंतु येथील शासन प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून आज त्या व्यवस्थेचा बळी ठरल्या आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री फक्त निवडणुकीपुरतेच स्वतःच्या लाडक्या बहिनी म्हणून घेतात परंतु महाराष्ट्रातील माता भहिणींवर येथील राजकीय लोक किंवा राजकीय नेत्याचे वरदहस्त असणारे लोक एका उच्च सुशिक्षित डॉक्टर महिलेचा अशा पद्धतीचे मानसिक आणि शारीरिक छळ करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संपदा मुंडे यांच्या राजकीय व्यवस्थेतील बळींना तात्काळ फासावर लटकावे आणि आपल्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा नसता स्वतःच्या पदाचा नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा हीमा डॉक्टर संघटनेचे राज्य सदस्य तथा जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे. डॉक्टर बांधवावर आणि भगिनींवर दिवसेंदिवस अत्याचार अन्याय वाढत आहेत, शासकीय सेवांमध्ये काम करत असताना पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलणे किंवा मेडिकल सर्टिफिकेट देणे, मेडिकल अहवाल बदलणे,राजकीय दबाव तंत्र वापरून इलीगल प्रीस्क्रीप्शन लिहून घेणे, मेडिसिन घेणे हे सर्रास होताना दिसत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये दारू पिऊन आलेले लोक, राजकीय नेत्याचे वरदहस्त असणारे गुंड किंवा गावातील ज्यांना कुत्रेही विचारत नाही असे लोक संबंधित सरकारी दवाखान्यांमध्ये येऊन सरकारी दवाखान्यातील स्टाफ,नर्सेस व डॉक्टर व सेक्युरिटी आणि कर्मचारी यांना नाहक त्रास देतात परंतु स्वतःची ड्युटी स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न लक्षात ठेवून निमुटपणे हा अत्याचार अन्याय सहन केला जातो परंतु हा अन्याय अत्याचार जेव्हा असाहाय्य होतो आणि या राजकीय लोकांच्या दबावाला मानत गेल्यामुळे एक ना एक दिवस स्वतःची घृणा यऊन आत्महत्येची वेळ नक्की येते अगदी अशाच पद्धतीची या यंत्रणेची बळी झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे ह्या एकच डॉक्टर नसून अशी अनेक प्रकरण महाराष्ट्र सह भारतामध्ये घडत आहेत परंतु डॉक्टरांच्या बाजूने असा कठोर कायदा असणे अपेक्षित आहे जेणेकरून गल्लीत आणि गावात ज्याला कुत्रे विचारत नाही असे व्यसनाधीन असणारी लोक सरकारी दवाखान्यामध्ये येऊन दादागिरी, टगेगिरी आणि राजकीय दबाव तंत्र वापरून शासकीय रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस व कर्मचारी यांना त्रास देणार नाहीत असा कायदा आणि अशी यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. तो डॉ संपदा मुंडे यांचा घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर 157 कॉल का करतो? त्या उपविभागीय अधिकाऱ्याने तक्रारीची दखल का घेतली नाही? त्यावर टाकलेल्या आर टी आय चा काय झालं? पी एस आय गोपाळ बदने का त्रास देत होता? डॉ संपदा यांना हॉटेल वर राहण्याची वेळ कोणी व का आणली गेली?तो माजी आजी खासदार कोण? ह्या सर्वांवर कार्यवाही झाली पाहिजे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचबरोबर अजित दादा पवार साहेब आणि आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर यांनी तात्काळ बैठक घेऊन महाराष्ट्राचे आणि बीड जिल्ह्याची भूमिपुत्री स्वर्गीय संपदा मुंडे यांचा झालेला व्यवस्थेचा बळी त्यांनी केलेली आत्महत्या आणि त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी सर्वच जबाबदार लोक यांना फासावर लटकावं आणि त्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा आणि हे जर करता येत नसेल तर स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे राज्य सदस्य तथा जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.

         सामान्य शेतकरी कुटुंबातून विशेषतः महिला गटातून उच्च शिक्षण घेऊन एमबीबीएस डॉक्टर पदवी संपादन करून शासकीय रुग्णालयामध्ये काम करत असताना जर अशा पद्धतीची आत्महत्येची वेळ कोणावर येत असेल तर मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्या,हा महाराष्ट्र गुन्हेगारी मध्ये सर्व सीमा ओलांडून भारतामध्ये टॉपवर असल्याचे दिसून येत आहे यावरून येथील राज्यकर्ते येथील शासनाचे आणि सरकारचे बगलबच्चे यांचा वाढलेला उत्पात सर्वस्वी दिसून येत आहे फलटण येथील माजी खासदाराचे, एका पोलीस अधिकारी गोपाळ बदने आणि त्या राहत असलेल्या घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांचेही नाव त्यात सामील असल्याचे बोलले जातं आहे त्याचबरोबर इतर जे जे जबाबदार राजकीयलोक, अधिकारी असतील त्यांना तात्काळ संविधानानुसार कठोर शासन करावे आणि त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला न्याय द्यावा ही अपेक्षा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.