दिवाळीनिमित्त आ.सुरेश धस यांच्या निवासस्थानी सलग तीन दिवस उत्सवी स्नेहमेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न
********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त मराठवाडा भूषण लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी सलग तीन दिवस भव्य उत्सवी स्नेहमेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसांच्या उत्सवी सोहळ्यात आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी तसेच विविध समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले निवासस्थान, पारंपरिक दिवाळी सजावट आणि स्नेहाच्या वातावरणाने परिसरात आनंदोत्सवाची लहर निर्माण झाली होती. आमदार धस यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत करून त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दिवाळी ही केवळ आनंदाचा नाही तर सामाजिक एकात्मता आणि विकासाचा उत्सव आहे. आपल्या मधील एकोपा,परस्पर प्रेम आणि पूरस्थितीत आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीत मदतीची भावना अधिक दृढ व्हावी, हेच या स्नेहमेळाव्याचे खरे सार आहे. या दरम्यान दररोज पारंपरिक दिवाळी फराळ आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी आपुलकीच्या वातावरणात स्नेहभोजनाचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि यांच्या कुटुंबीयांनीही सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत, आनंद आणि एकोप्याचा संदेश दिला. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमातून एकता, सामाजिक सलोखा आणि आनंदी समाजनिर्मितीचा सुंदर संदेश संपूर्ण मतदारसंघात पसरला आहे.


stay connected