*विजयादशमी निमित्त पाटोद्यात हिंदू– मुस्लिम– दलित ऐक्याचा अनोखा संदेश!*
➡️ देशात द्वेषाची बीजे पेरली जात असताना पाटोद्यात मात्र एकतेचा दिवा प्रज्वलित
पाटोदा *(प्रतिनिधी)* विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर पाटोद्यातील सामाजिक व राजकीय नेत्यांनी एकत्र येत हिंदू, मुस्लिम व दलित ऐक्याचा हृदयस्पर्शी संदेश पाटोद्यात दिला आहे. धर्माभिमानाच्या नावाखाली समाजात तणाव व फूट निर्माण करण्याचे प्रयत्न देशात सुरू असताना पाटोद्यात मात्र ऐक्याची परंपरा जपण्याचे काम झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद आबुशेठ, पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू (भैया) जाधव,युवानेते संदीप जावळे, नगरसेवक नय्युम पठाण,सय्यद साजेद, तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता वाघमारे यांनी परस्परांना गळाभेट देत धर्म जातीपलीकडे जाऊन एकतेचा विजय हा खरा विजय असल्याचा संदेश दिला.यावेळी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आबुशेठ सय्यद, व नगराध्यक्ष जाधव यांनी सांगितले की,आमचे नेते आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे की “धर्माधर्मात द्वेष, जातीपातीची दरी न करता सर्वांनी एकत्र राहणे हाच संदेश देण्यासाठी पाटोद्यासारख्या ठिकाणी विविध समाजाचे नेते एकत्र येऊन मैत्री, बंधुता व सौहार्द टिकविण्याचे काम करतात,हेच खरी विजया दशमीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ”विजयादशमीच्या शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवरांनी समता, सौहार्द व ऐक्य हेच भारतीय संस्कृतीचे खरे शस्त्र असल्याचे नमूद केले. यामुळे पाटोद्यातील नागरिकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना निर्माण झाली. या घटनेतून “धर्म बदलला तरी माणुसकी नाही” हा संदेश समाजात पोहोचला असून पाटोद्यातील हा उपक्रम महाराष्ट्रासाठी सामाजिक ऐक्याचा आदर्श ठरणार आहे.
stay connected