पुणे जिल्ह्य़ातील लोहगांवच्या लोकांकडून सहा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात! संदिप खाकाळसह नागरिकांनी मानले आभार

 पुणे जिल्ह्य़ातील लोहगांवच्या लोकांकडून सहा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात!
संदिप खाकाळसह नागरिकांनी मानले आभार 



    कडा:आष्टी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेकांचे कधीच भरून न येणारे नुकसान झाले.अन्नधान्य, संसार वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर आले.या पूरग्रस्त कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करत कडा गटातील विविध गावात पुणे जिल्ह्य़ातील लोहगाव येथील नागरिक धावून आले आणि अन्नधान्यासह किराणा किटचे वाटप केले. या सर्व दात्यांचे संदिप खाकाळ सह नागरिकांनी आभार व्यक्त केले .   

   आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द, चोभानिमगाव, नांदा,धिर्डी,शिराळ यासह अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्याने कुटुंब उघड्यावर आले होते.त्याना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व सामाजिक देणं या भावनेतून पुणे जिल्ह्य़ातील लोहगांव येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून अन्नधान्यासह किराणा कीटचे शुक्रवारी वाटप केले.पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केल्याने सामाजिक कार्यकर्ते संदिप खाकाळ,सुनिल सुर्यवंशी याच्यासह ग्रामस्थांनी दानशूर लोकांचे आभार व्यक्त केले. यावेळी लोहगाव येथील सोमनाथ उर्फ बाळासाहेब वामन, खांदवे हरिभाऊ नाना काळे, उमेश खांदवे ,काळूराम साठे विलास खांदवे, बापू गरुड, शांताराम रासकर याच्यासह टीमचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.