अंभोरा फाट्यावर एस.टी. बसथांबा मंजूर खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

 अंभोरा फाट्यावर एस.टी. बसथांबा मंजूर 
खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश




आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील जामखेड ते अहिल्यानगर महामार्गावरील अंभोरा फाटा व परिसरातील ग्रामस्थांना दिलासा देणारी बातमी म्हणजे अखेर अंभोरा फाटा येथील एस.टी. बसथांब्याला शासनाची मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकृत आदेश काढत येथे बसथांबा मंजूर केला आहे.

या निर्णयासाठी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार  बजरंग सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. अंभोरा येथील ग्रामस्थांनीही सातत्याने खासदार म्हणून पाठपुरावा केल्यामुळे हे काम तातडीने मार्गी लागले.  या निर्णयामुळे अंभोरा ग्रामस्थांसह नांदूर, सालेवडगाव, सुलेमान देवळा, आठवड आदी पंचक्रोशीतील प्रवासी, शेतकरी व विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यार्थी आता शिक्षणासाठी सहजपणे अहमदनगर येथे प्रवास करू शकतील. तसेच अहमदनगर येथे दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना व ग्रामस्थांना मोठी सोय होणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व नागरिकांच्या आरोग्य उपचारांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांच्या व जेष्ठ नागरिकांच्या वतीने खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

ग्रामस्थांचा निर्धार – “अंभोरा फाटा बसथांबा हा आमच्या संघर्षाचा आणि जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांचा यशस्वी पुरावा आहे.”

खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे अहिल्यानगर–पिंपरखेड ही बस सुरू करण्याचे आदेशही निघाले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांनी खासदार साहेबांचे आभार मानले आहेत.

 खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की – “जनतेच्या सोयीसाठी व विकासासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.”



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.