लोहगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले --------------------------- अडीचशे आपत्तीग्रस्तांना किराणा मालाचे किट वाटप

 लोहगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसले
---------------------------
अडीचशे आपत्तीग्रस्तांना  किराणा मालाचे किट वाटप




------------------------

 राजेंद्र जैन /कडा

--------------------

आष्टी तालुक्यात मागील पंधरा दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी, छोट्या -मोठे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यात अनेकांची घरे, जनावरे आणि संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या. अशा हवालदिल झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीला पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी कड्यात आले. आणि अडीचशे आपत्तीग्रस्तांना  किराणा मालाचे किट वाटप करून गोरगरिबांचे अश्रू पुसून त्यांनी सामाजिक दायित्व दाखवून दिले आहे.


आष्टी तालुक्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, डॉक्टर्स यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, काहींची शेती वाहून गेली, पिके सडली, जनावरे वाहून गेली, कडा, शिराळ, नांदा, धिर्डी, शेरी, खुर्द, निमगाव चोभा या परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वसामान्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. अनेकांच्या घरात, शेतात पाणी घुसल्यामुळे जमिनी, पिकासह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या, त्यामुळे अनेक पूरग्रस्तांचे कुटुंबे उघडी पडली आहेत. अशा आपतिग्रस्त  कुटुंबियांच्या मदतीसाठी पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ नाना काळे, सोमनाथ उर्फ बाळासाहेब खांदवे, उमेश खांदवे, काळूराम साठे, विलास खांदवे, बापू गरुड, शांताराम रासकर या कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्वाची भावना जोपासून आष्टी तालुक्यातील जवळपास पाच ते सहा गावातील गोरगरीब पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किट वाटून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. याप्रसंगी केरूळचे सरपंच सुनील सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ, ज्येष्ठ नागरिक भिमराव पाटील, कांद्याचे व्यापारी मयूर नलावडे, अक्षय सूर्यवंशी, सोमनाथ वाघमारे, किराणा मालाची व्यापारी राम ससाने, राम साखरे, चोभा निमगावचे शहादेव खेंगरे, पत्रकार राजेंद्र जैन आदी मान्यवरांच्या हस्ते पूरग्रस्तांना किराणामालाचे किट वाटप करण्यात आले.

-------%%----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.