कवी शाम बैसाणे यांचा अभिलाषा कविता संग्रहाचे प्रकाशन

 कवी शाम बैसाणे यांचा  अभिलाषा कविता संग्रहाचे प्रकाशन 




मुंबई / प्रतिनिधी


पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत आयोजित  शाम परशुराम बैसाणे  लिखित अभिलाषा काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशन 

ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत शिवा इंगोले यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली रविवार दिनांक  १२/१०/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पासपोली बीएमसी शाळा, आयआयटी क्षेत्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई, मुंबई येथे संपन्न होणार असून  या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते भटू जगदेव ( प्रकाशक अनित्य प्रकाशन/ साहित्यिक),  जीवनसंघर्षकार फेम नवनाथ रणखांबे ( साहित्यिक / विचारवंत ), अॅड. नाना अहिरे ( प्रसिद्ध विधितज्ञ ), प्रा. गीता मोदले ( रुईया कॉलेज ), बाबा बोऱ्हाडे ( समाज सेवक) असून सोहळ्याचे  प्रास्ताविक डॉ. सुशील बैसाणे, सूत्रसंचालन आशा रणखांबे  (मुख्याध्यापिका अनुदानित आश्रम शाळा बाबरे / जिल्हास्तरीय  सदस्या पोलीस महिला दक्षता कमिटी  ठाणे) आणि  आभार डॉ. संतोष मालुसरे (महाबळेश्वर )  करणार आहेत . या प्रसंगी  धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने प्रबोधन काव्यगंध समाज परिवर्तनाचे निमंत्रित आणि उपस्थितांचे कवी संमेलन  होणार असून प्रेक्षक रसिक श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.